आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​एक्स्पर्ट ओपिनियन:संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील, पेपरही सोपा होता

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या लेखी परीक्षेला २ मार्चपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी संस्कृत भाषा विषयाचा पेपर झाला. संस्कृत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय असल्याने मोठ्या प्रमाणात याकडे विद्यार्थी वळतात. हा पेपर सोपा असून व्याकरणही साेपे हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील, असे मत विषय शिक्षकांनी व्यक्त केले.

सर्व विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये पेपर साेडवला, व्याकरणही सोपे होते संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अतिशय सोपे होते. विशेष म्हणजे गद्य आणि पद्यावरील प्रश्नही सोप्या पद्धतीने विचारल्यामुळे विद्यार्थ्यांवर अधिक तणाव पडला नाही. हा पेपर सर्वसाधारण मुले सोडवतील, असा होता. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. व्याकरणही सोपे विचारल्याने विद्यार्थी वेळेत पेपर सोडवू शकले. -प्रतीक्षा खंदारे

संपूर्ण गुण देणारा पेपर संस्कृत हा ८० गुणांचा पेपर होता. यात ज्या विद्यार्थ्यांनी प्रीलिमचे काही पेपर सोडवले, त्यांच्यासाठी हा पेपर खूप सोपा होता, पण ज्यांनी दुर्लक्ष केले, त्यांना कदाचित पेपर अवघड गेला असावा. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील षष्ठम विभाग हा प्रश्न जरा अवघड जातो. कारण, हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरील असताे. बाकी पैकीच्या पैकी गुण देणारा हा विषय आहे. -महिपाल विश्वनाथ व्यवहारे

बातम्या आणखी आहेत...