आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसाहतीत ढीग साचले:साताऱ्यात आठ महिन्यांपासून केवळ चारच गाड्यांतून कचऱ्याचे संकलन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती आहेत. या परिसरात कचरा संकलनासाठी महानगरपालिकेने पूर्वी रेड्डी कंपनीला आठ गाड्या दिल्या होत्या. परंतु ठेकेदार मागील आठ महिन्यांपासून केवळ चारच गाड्यांनी कचरा संकलन करत असल्याने परिसरातील नागरिकांना सात ते आठ दिवस घरात कचरा ठेवावा लागत आहे, तर काही रहिवासी आसपास असलेल्या रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचरा संकलन गाड्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. कॉल सेंटरवर फोन करून करा तक्रार : महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी टोल फ्री नंबर दिला आहे. त्यावर नागरिकांनी तक्रारी केल्यास त्वरित सोडवण्यात येतात, असा दावा मनपाकडून करण्यात आला. नागरिकांनी मनपाच्या समाधान व तक्रार निवारण सेंटरच्या टोल फ्री नं. १५५३०४ नंबर वर तक्रार दिली नाही, अशी माहिती मनपाने दिली.

दुसऱ्या दिवशीच वास येतो सुका कचरा तरी सांभाळता येतो, परंतु ओल्या कचऱ्यातून दोन दिवसांतच दुर्गंधी सुटते. घरातील लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मनपाने दररोज कचरा संकलन करावे, अशी मागणी पृथ्वीनगरातील पद्मसिंह राजपूत यांनी केली.

निवेदनाचा परिणाम होत नाही आमच्या परिसरातील कचरा वेळेत जमा करून न्यावा यासाठी मनपा प्रशासन, वॉर्ड अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली. परंतु त्याचा उपयोग होत नाही. मनपाने गाड्या वाढवाव्या व आमच्या समस्या सोडवाव्या. - सोमीनाथ शिराणे, अध्यक्ष संघर्ष समिती सात ते आठ दिवस कचरा

कसा साठवावा? घरातून दररोज कचरा निघतो. तो एक किंवा दोन दिवस संकलन करून ठेवता येते. परंतु सात ते आठ दिवस आम्ही कचरा संकलन करून कसा ठेवावा हाच प्रश्न आहे. - आबासाहेब देशमुख, ज्ञानेश्वरनगर कचऱ्यामुळे त्रस्त झालो कचरा वेळेत संकलन होत नसल्याने घरातून दुर्गंधी येते. त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. - संजय मदने

बातम्या आणखी आहेत...