आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांत पाणी:सत्कर्मनगरात जमिनीपासून चार फूट उंच उचलले राहते घर ; प्रति 250 रुपये स्वे.फूट खर्च

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर बांधताना भविष्यात रस्त्याच्या वाढणाऱ्या उंचीचा विचार केला जात नाही. तसेच उतारातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याच्या समस्या उद्भवतात. अशा वेळी घरांचे पुनर्बांधकाम करता येत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून घरच काही फुटांपर्यंत वर उचलणे शक्य आहे. असाच प्रयोग सातारा परिसरातील अय्यप्पानगरच्या पुढील सत्कर्मनगरात राबवून आनंद कुलकर्णी, संजय गडाख यांचे घर चार फुटांपर्यंत वर उचलले. यासाठी २५० जॅक आणि १८ कामगारांची मदत लागली. आनंद कुलकर्णी यांचे १२०० स्क्वे. फूट, तर संजय गडाख यांचे ८०० स्क्वे. फूट असे एकूण २ हजार स्क्वे. फुटांचे बांधकाम आहे. या भागात २०११ पासून राहत आहेत. त्यांना पावसाळ्यात पाणी घरात शिरण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. या वेळी कुलकर्णी यांनी घरांचे पुनर्बांधकाम करण्याचा विचार केला. मात्र खर्च अवाक्याबाहेर जात होता. अनेकदा घरासमोर उंचवटा करूनही समस्या सुटेना. त्यामुळे त्यांनी यूट्यूबवर घरांचे लिफ्टिंग होण्याचा व्हिडिओ पाहिला अन् स्वत:चे घरही असेच वर लिफ्टिंग करून समस्या सुटू शकते, यावर विचार करून संबंधित कंपनीशी संपर्क साधला. आनंद यांनी हैदराबादच्या श्रीराम बिल्डिंग लिफ्टिंगचे विकास राणा यांच्याशी संपर्क साधला. या वेळी त्यांनी एक व्यक्ती पाठवून घराच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर घर लिफ्टिंगचा करार केला. १६ मे रोजी प्रत्यक्ष घर लिफ्टिंगच्या कामाला सुरुवात केली. २५० जॅक आणि १८ कामगारांच्या मदतीने ४ फूट उंच घर उचलण्यात आले. साधारणत: एक ते सव्वा महिना संपूर्ण घराचे काम पूर्ण होण्यास लागताे.पुनर्बांधकामापेक्षा हा खर्च कमी, पाण्याची समस्या सुटली पावसाचे पाणी सातत्याने घरात शिरत हाेते. ही समस्या साेडवण्यासाठी पुनर्बांधकाम करणेही अशक्य होते. त्यामुळे घर लिफ्टिंग करण्याचा पर्याय शोधला आणि ४ फुटांपर्यंत घर वर घेण्यात आले. पुनर्बांधकामापेक्षा हा खर्च कमी आहे. -आनंद कुलकर्णी, घरमालक

बातम्या आणखी आहेत...