आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नोेटाबंदीच्या सहा वर्षांत चलनी नोटांच्या संख्येत 44 टक्के तर मूल्यात 89 टक्के वाढ

महेश जोशी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० वर्षांत नोटा दुपटीने तर मूल्य तिप्पट वाढले सर्वाधिक ६८.४% नोटा ५०० च्या {२००० रुपयांच्या नोटांमध्ये घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या ६ वर्षांत नोटांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. २०१६ ते २०२२ दरम्यान चलनी नोटांची संख्या ४४% तर त्यांचे मूल्य ८९% वाढले. चलनातील एकूण नोटांपैकी ५०० व २०००च्या नोटांची संख्या ३६.५% असून त्यांचे मूल्य सर्वाधिक ८७.१% आहे. २००० च्या नोटांत मात्र घट होत आहे. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी २ हजार मूल्यांची नोटच बंद करावी, अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा करताना ही काळ्या पैशांविरुद्धची मोहीम असल्याचे सांगितले. हा निर्णय कॅशलेस अर्थव्यवस्था व डिजिटल व्यवहारांच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, नोटाबंदीनंतर नोटांची संख्या कमी होण्याएेवजी वाढतच चालली आहे. नोटाबंदीचे वर्ष २०१६ च्या तुलनेत २०२२ मध्ये चलनी नोटांची संख्या दुपटीने वाढल्याचे रिझर्व्ह बँँकेच्या “रिझर्व्ह मनी कंपोनंट्स अँड सोर्सेस-२०२२”या अहवालातून स्पष्ट होत आहे.

नोटाबंदीनंतर नोटांची संख्या कमी होण्याऐवजी दुप्पट वाढली

१० वर्षांत चलनी नोटांची संख्या दुपटीने तर मूल्य तिप्पट वाढले. नोटाबंदीच्या वर्षी म्हणजे मार्च २०१६ मध्ये ९,०२,६६० लाख नोटा १६,४१,५०० कोटी मूल्यासह चलनात हाेत्या. २०२२ मध्ये १३,०५,३२६ लाख नोटा व मूल्य ३१,०५,७२१ कोटी होते. नोटाबंदीच्या ६ वर्षांत नोटांची संख्या ४४.६० % तर त्यांचे मूल्य ८९.२० टक्क्यांनी वाढले.

कोरोनानंतर नोटा वाढल्या : १, २, ५, १० आणि २० रुपयांची नाणीही चलनात

कोरोनाचे वर्ष २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये नोटांची संख्या १२.५५ टक्क्यांनी तर त्यांचे मूल्य २८.२८ टक्क्यांनी वाढले. रिझर्व्ह बँकेच्या वतीने २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० व २००० रुपयांच्या नोटा छापल्या जातात, तर १, २, ५, १० आणि २० रुपयांची नाणीही चलनात आहेत. ३१ मार्च २०२२ रोजी- संख्येच्या दृष्टीने एकूण नोटांपैकी २, ५, १०, २०, ५० व १००च्या ६७.६% नोटा चलनात असून त्यांचे मूल्य सर्व नोटांच्या तुलनेत १२.२ % आहे. एकूण नोटांपैकी ५०० व २००० च्या नोटांची संख्या ३६.५ % तर मूल्य ८७.१ % आहे. ५०० रुपयांच्या नोटात सतत वाढत आहेत. २०२० मध्ये ५०० च्या २५.४ %, २०२१ मध्ये ३१.१ % तर २०२२ मध्ये ३४.९ % नोटा चलनात आल्या. त्यांचे मूल्य एकूण चलनातील नोटांच्या अनुक्रमे ६०.८%, ६८.४ % आणि ७३.३ % आहे. ५०० नंतर सर्वाधिक १० रुपयांच्या २७८०४६ लाख (२१.३ %) नोटा असून त्यांचे मूल्य २७८०५ कोटी (०.९%) आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये २०० रुपयांच्या नोटांची संख्या ०.१ % घटली. तर २० रुपयांच्या नोटांची संख्या ७.३ % हून ८.४ % झाली.

२०००ची नोेट बंद करा
भाजपचे राज्यसभेचे सदस्य सुशीलकुमार मोदी यांनी २ हजार रुपयांची नोट बंद करण्याची मागणी सभागृहात केली. हजार रुपयांची नोट बंद केल्यावर २ हजारांची सुरू ठेवण्यात अर्थ नाही, असे ते म्हणतात.

डिजिटल व्यवहारही जोरात
कोरोनाकाळात डिजिटल व्यवहारांना मिळालेली गती पुढेही कायम राहिली. मार्च २०१९ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये २१६ टक्क्यांची वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...