आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढ आवाज:औंढा तालुक्यातील काही गावांमध्ये भुगर्भातून मोठा आवाज, गावकऱ्यांतून भीतीचे वातावरण

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुढ आवाजानंतर औंढ्याचे तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. - Divya Marathi
गुढ आवाजानंतर औंढ्याचे तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी गावात भेट देऊन पाहणी केली.
  • याबाबत भूकंपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले

औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांमधून बुधवारी (ता. १९) सकाळी साडेसहा वाजता भूगर्भातून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत होणारे आवाज गावकऱ्यांसाठी साठी चिंतेचा विषय बनले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यात सोबतच कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही गावातून मागील दोन ते तीन वर्षापासून भूगर्भातून सतत आवाज होऊ लागले आहेत. अचानक भूगर्भातून होणारा गडगडाट यामुळे गावकऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. या ठिकाणी भूगर्भातून कशामुळे आवाज होतात याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय मेट्रोलॉजिकल विभागाला कळविले आहे.

यासोबतच जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांना भुकंपा सारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृतीही केली आहे. तसेच प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी या गावांना भेटी देऊन पाहणी देखील करीत आहेत. नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या पथकाने या परिसरात घेऊन पाहणी केली होती. भूगर्भात असलेल्या पोकळीमध्ये पाणी शिरल्यानंतर मोठा आवाज होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान आज सकाळी साडेसहा वाजता औंढा तालुक्यातील पिंपळदरी राजदरी, सोनवाडी, जांभरून कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, नांदापूर, बोल्डा, वसमत तालुक्यातील वापटी, पांगरा शिंदे आदीसह परिसरातील काही गावांमधून भुगर्भामधून मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले अवघ्या काही सेकंदात मोठा आवाज होऊन गडगडाट झाला. मात्र याबाबत भूकंपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

परिसरात मागील दोन ते तीन वर्षापासून होणारे आवाज गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले असून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे भूगर्भातील आवाज यामुळे गावकरी चांगलेच कात्रीत अडकले आहे.

भूगर्भातील आवाजाबाबत योग्य परिक्षण व्हावे- बापूराव घोंगडे पिंपळदरी
औंढा सह परिसरातील तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून सतत होणारे आवाज गावकर्‍यांना धडकी भरवणारे ठरु लागले आहे. प्रशासनाने आता वरिष्ठ पातळीवरील शास्त्रज्ञांकडून या परिसरात सर्वेक्षण करावे व नेमका आवाज कशामुळे येत आहे याची माहिती गावकऱ्यांना द्यावी . त्यामुळे गावकऱ्यां मधून भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...