आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरपत्रिका घेवून पळून जाणाऱ्या विद्यार्थ्याचे (डब्ल्यूपीसी) होल परफॉर्मन्स कॅन्सल करण्यात येणार आहे. पोलीसांकडील कार्यवाही तशी सुरु राहिल. मंडळाच्या वतीने चौकशी नेमूण राज्यमंडळाला त्याचा अहवाल पाठवण्यात येईल.तसेच विद्यार्थ्यास बोर्डातही सुनावणीसाठी बोलवण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस 21 मार्च पासून सुरुवात झाली. परीक्षेतील गैरप्रकार टाळावेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मंडळाच्या वतीने वारंवार बैठका घेवून सूचित करण्यात आले आहे. तसेच यंदा प्रथमच विद्यार्थ्यांसाठी शिक्षा सूची देखील जाहिर करत सर्व केंद्रावर लावण्यात आली, पेपरला आत सोडण्यापूर्वी त्या सूचीचे जाहिरपणे वाचनही करण्यात येत आहे.
असे असतांना देखील शुक्रवार दि. 3 मार्च रोजी गणिताच्या पेपरमध्ये लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाल्याची घटना नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर घडली. याप्रकरणी विद्यार्थ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्डाच्या नियमानुसार उत्तरपत्रिकेवर अनाधिकृतरित्या बदल करणे, लिहिलेली उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाणे किंवा बाहेरुन लिहून आणणे, एका विद्यार्थ्यांऐवजी दुसऱ्याने पेपर अथवा परीक्षा देणे, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांबरोबरच प्रक्षोभक व्यवहार करणेे आदी गैरमार्गप्रकरणी शिक्षासूची प्रमाणे संबंधितांची संपूर्ण परीक्षेची परवानगी रद्द करुन त्यांना पुढील पाच परीक्षांना बसण्यास प्रतिबंध करता येतो.
हाच नियम लावत आता उत्तरपत्रिका पळवणाऱ्या विद्यार्थ्यावर देखील विभागीय मंडळाच्या वतीने कार्यवाही करत त्याचे सर्व विषयाचे गुण रद्द करण्यात येतील. तसेच उत्तरपत्रिका बाहेर नेल्या प्रकरणी चौकशी समिती नेेमून त्याचा अहवाल राज्यमंडळास सादर करण्यात येईल. अशा प्रकरणातील विद्यार्थ्याची पुन्हा बोर्डातही सुनावणी घेण्यात येईल असेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
सोमवारी दहावीचा इंग्रजी भाषा विषयाचा पेपर आहे. तर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी उत्तरपत्रिका घेवून पळाल्याच्या घटनेनंतर मंडळाने सर्व परीक्षेचा आढावा घेत गैरप्रकार घडू नयेत म्हणून पुन्हा शनिवारी मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून परीक्षेचा आढावा घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.