आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेगमपुरा भागातील ग्रामदैवत असलेल्या निपट निरंजन महाराज यात्रेत सोमवारी, १९ डिसेंबरला ५ क्विंटल बोरांचा प्रसाद चढवण्यात आला. यासोबतच ८ तास चाललेल्या कुस्ती स्पर्धेत ६ जिल्ह्यांतील ४ हजार मल्लांनी मुकाबला केला. सर्वाधिक चुरशीच्या पतंगबाजीच्या खेळात ३३० जणांनी सहभाग नोंदवला.
निपट निरंजन संस्थांनच्या वतीने निपट निरंजन बाबांचा जन्मोत्सव सफला एकादशीला साजरा केला जातो. यानिमित्ताने यात्रा भरते. पहाटे ६ वाजता महाराजांना ८ भाविकांनी अभिषेक केला. यानंतर दर्शनार्थींच्या रांगा लागल्या होत्या. वर्षानुवर्षांची परंपरा असलेली लाल मातीतील कुस्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. बेगमपुऱ्यातील हनुमान व्यायामशाळा या स्पर्धेचे नियोजन करते. हनुमान शाळेचे ६२ मल्लही स्पर्धेत उतरले आहेत.जालना, धुळे, रोहिलागड, जळगाव, अहमदनगर येथून आलेल्या मल्लांनी दोन हजार कुस्ती खेळल्या. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, कोषाध्यक्ष प्रेमराज डोंगरे, सुरेश पवार, विलास संभारे, संतोष गुजराती उपस्थित होते.
आज ५ हजार भाविकांसाठी प्रसाद निपट निरंजन बाबा औरंगाबादेत आले तेव्हा नाथमंदिरात राहत होते. त्यामुळे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी औरंगपुऱ्यातील भाविक खिचडीचा प्रसाद आणतात. ५ हजार भाविक लाभ घेतील. -गणू पांडे, सचिव, मंदिर ट्रस्ट
१६ मुलीही घेताहेत प्रशिक्षण यात्रा महोत्सव सुरू झाला तेव्हापासून हनुमान व्यायामशाळा कुस्त्यांचे आयोजन करते. सध्या आमच्याकडे ६२ मल्ल आणि १६ मुली प्रशिक्षण घेत आहेत. - प्रा. हंसराज डोंगरे, संचालक, व्यायामशाळा
औरंगजेबाला दिली होती बोरे : निपट निरंजन महाराजांना भेटण्यासाठी औरंगजेब हत्तीवरून आला होता. त्याला बाबांनी बोरं दिली होती, अशी कहाणी आहे. बाबांचे आवडते फळ असलेली बाेरेच या यात्रेत भाविक बाबांना अर्पण करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.