आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला दुसर्या दिवशी गुरूवारी ३४९ उमेदवार गैरहजर राहिले. एक हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलविण्यात आले होते. ६५१ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील दोघांनी वैयक्तीक कारणामुळे मैदानी चाचणीला नकार दिला, तर ५१ उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित ५९८ उमेदवारांनी चाचणी दिली. चाचणी दरम्यान एक जण जखमी झाला आहे.
सुरुवातीचे दोन दिवस पोलिस चालक पदाच्या १० जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात आल्यानंतर ४ जानेवारीपासून पोलिस शिपाई पदाच्या १२९ जागांसाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी ३९६ उमेदवार गैरहजर होते. काल दुसऱ्या दिवशी एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले होते. मात्र, प्रत्यक्षात ६५१ उमेदवार चाचणीसाठी हजर राहिले. त्यातील दोघे भरतीसाठी पात्र झाले असतानाही वैयक्तीक कारणामुळे त्यांनी चाचणी देण्यास नकार दिला. चाचनीपूर्व तपासणीत ५१ उमेदवार अपात्र ठरले. आज शुक्रवारी पुन्हा एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे.
दोन दिवसात साडेसातशे जणांची पाठ पोलिस भरतीसाठी १२ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. दोन दिवसांपासून शिपाई पदासाठी प्रक्रिया सुरू आहे. दररोज एक हजार उमेदवारांना बोलाविण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी ३९६ तर दुसऱ्या दिवशी ३४९ असे दोन दिवसात ७४५ उमेदवारांनी पोलिस भरतीकडे पाठ फिरवली आहे. पोलीस खात्यात भरतीसाठी वर्षानुवर्षे अनेक युवक तयारी करतात. मात्र, प्रत्यक्षात भरतीवेळी ३५ ते ४० टक्के युवक गैरहजर राहत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.