आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरेतील थंड वारे आपल्याकडे वाहून येत आहेत. त्यामुळे किमान तापमानात सतत घसरण होत आहे. मंगळवारी किमान तापमान १०.४ अंश सेल्सियस, तर दुसऱ्या दिवशी बुधवारी १०.२ अंश सेल्सियस अशा नीचांकी पातळीवर नोंदवले गेले. तर कमाल तापमानात मात्र सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी वाढ होऊन ते ३१.५ अंशांवर गेले होते. त्यामुळे पहाटे थंडीचा कडाका जाणवत असून दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामानातील बदलामुळे अस्थिर स्थिती निर्माण होत आहे. याचा जनजीवनावर थेट परिणाम होत असून सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि तापाने रुग्ण फणफणू लागले आहेत. फळे, पिकांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. यावर मात करण्यासाठी ताजा-पोषक आहार घ्यावा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.