आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च:नॅशनल आस्परेशन इंडेक्समध्ये भारतीयांच्या महत्त्वाकांक्षेची पातळी कोरोनापूर्व काळाएवढी, देश पूर्वपदावर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य - मानसिक आरोग्य, आनंदाला सर्वोच्च प्राधान्य, पूर्वीसारखेच जीवन जगण्याची ऊर्मी नवी दिल्ली देशाचा नॅशनल आस्परेशन इंडेक्स (राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा निर्देशांक) कोरोनापूर्वीच्या पातळीवर 87.3 पोहोचला आहे. इंडेक्स 2020 च्या तुलनेत 7.4 अंक वधारला. कोरोना संकट मागे सारून देश प्रगतिपथावर निघाल्याचे ते निदर्शक आहे. लोक आता मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. आता पूर्वीप्रमाणेच आनंदी जीवन जगण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे.

पैसा - महागाई असूनही प्राधान्यक्रम कायम , भलेही 77% अधिक खर्च करावा लागतोय नवी दिल्ली देशाचा नॅशनल आस्परेशन इंडेक्स (राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा निर्देशांक) कोरोनापूर्वीच्या पातळीवर 87.3 पोहोचला आहे. इंडेक्स 2020 च्या तुलनेत 7.4 अंक वधारला. कोरोना संकट मागे सारून देश प्रगतिपथावर निघाल्याचे ते निदर्शक आहे. लोक आता मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. आता पूर्वीप्रमाणेच आनंदी जीवन जगण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे.

घर - चेन्नई-मुंबईत लोकांचे स्वत:च्या घराला प्राधान्य मुंबई, चेन्नई, कोलकात्यामधील लोकांचे कुटुुंबीयांजवळ राहण्यापेक्षाही स्वत:च्या हक्काचे घर होणे महत्त्वाचे वाटते. बंगळुरूतील नागरिकांनी मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले आहे, तर दिल्लीकर चांगलेचुंगले खाणेच पसंत करतात. -सर्वेक्षणात 29% लोकांनी पहिल्या पाच गोष्टींमध्ये शक्य तितक्या लवकर निवृत्ती पत्करणे याला महत्त्व दिले. त्यामुळेच आयुष्यभर पुरेल इतका पैसा जमवण्यासाठी गुंतवणूक वाढली.

49% नी गृह, 43% नी वाहन कर्ज घेतले -मुंबईचे लोक मैत्री (89.7) च्या तुलनेत महागड्या वस्तू (89.8) खरेदी करण्याला अधिक पसंती देतात. -हैदराबादकर मानसिक आरोग्यापेक्षा (90.8) महागड्या लग्न सोहळ्यास (91.1) प्राधान्य देतात. बंगळुरूत लोकांनी उत्तम मानसिक आरोग्यास (स्कोर 90.6) प्राधान्य दिले अाहे. मुलांचे शिक्षण (90.3), स्वत:चे घर (89.7) हे त्यानंतर येते. छानछौकीला अजिबात थारा नाही. चेन्नईच्या लोकांचे सर्वोच्च प्राधान्य घरास (91.6) आहे. इथे महागडे विवाह सोहळे नाहीत : टियर-2 शहरातील लोक नात्यांना अधिक महत्व देतात. विवाह समारंभांवर अनावश्यक पैसा उधळणे इथे मान्य नाही.

बातम्या आणखी आहेत...