आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या अर्ध्या तासात पाच जणांच्या टोळीने पगारिया ऑटो शोरूममधील १५ लाख ४३ हजार २४७ रुपये रोख असलेल्या तिजोऱ्या लंपास केल्या. लोखंडी जाळीचे शटर एका बाजूने उचकटून चाेरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कॅश काउंटर केबिनची काच फोडून तिजोऱ्या घेऊन गेले. छावणी उड्डाणपुलाखाली दगडाने तिजोरी फाेडून त्यातील राेख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
जालना रस्त्यावरील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विरुद्ध दिशेला पगारिया ऑटोचे कार व दुचाकीचे दालन आहे. येथे अभिषेक राय (४१) हे अॅडमिन मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे सुरक्षा, बाहेरील सर्व कामकाज व प्रशासकीय कामांची जबाबदारी आहे. ३ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता शोरूम बंद केल्यानंतर सुरक्षा रक्षकाने व्यवस्थापक कमलेश मुनोत यांच्याकडे चाव्या जमा केल्या. बुधवारी रात्री राजेंद्र सोनवणे व रावअण्णा गारेलू हे सुरक्षा रक्षक कर्तव्यावर हाेते.
दगडाने तिजोरी फोडून पळवली रोकड
सकाळी एका पादचाऱ्याला छावणी उड्डाणपूल परिसरात तिजोऱ्या दिसल्यानंतर त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या जप्त केल्या. तिजोऱ्यांशेजारी मोठ्या आकाराचे दगड हाेते. त्यानेच ते फोडल्याचा अंदाज पाेलिसांनी बांधला. दुपारी ३.३० वाजता राय यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पगारिया ऑटोचे ८ लाख ७१ हजार ३४०, तर पगारिया ऑटो सेंटरचे ६ लाख ७१ हजार ९०७ रुपये रोख चोरीला गेल्याचे म्हटले आहे.
सीसीटीव्हीवर पावसाचे पाणी पडल्याने अडचण
पोलिसांनी परिसरातील अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. पण रात्री मुसळधार पावसाने कॅमेऱ्यांवर पाणी पडत हाेते. त्यामुळे चोर नेमके कुठून आले व कुठे गेले हे कळले याचा शोेध लावण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
अवघ्या ४५ मिनिटांत चोरी मध्यरात्री १ वाजता अंदाजे १८ ते २८ वयोगटातील पाच जणांचे टोळके तापडिया मैदानात आले. लागूनच असलेल्या शोरूमच्या भिंतीवरून उड्या मारून त्यांनी कंपाउंडमध्ये १ वाजून १५ मिनिटांनी प्रवेश केला. एकाने पॅन्ट्रीच्या खिडकीची काच फोडली. पण दरवाजा बंद असल्याने आत जाता आले नाही. नंतर त्यांनी शटर डाव्या बाजूने उचकटवले. शटरच्या मागचा काचेचा दरवाजा उघडा होता. एक चोर कंपाउंडमध्ये, दोघे शटरजवळ उभे राहिले. दोघे तोंडाला आत घुसले. थेट काउंटरचे जाड काचेचे केबिन फोडले व दोन तिजोऱ्या घेऊन १.४५ वाजता पळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.