आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:रेमडेसिवीर प्रकरणी  आमदार सुरेश धस आक्रमक , जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झाली खडाजंगी

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजेक्शनच्या नियंत्रणाची डोईफोडेे यांच्याकडील जबाबदारी काढुन धरमकरांकडे दिली

लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांना काय उत्तरे द्यायची आम्हाला जर एक सुध्दा रेमडेसिवर इंजेक्शन दिले गेले नाही तर आम्ही माणसं जाळायची तरी किती ‌? आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात दिडशे लोक कोरोनावर उपचार घेत असुन इंजेक्शन मिळत नसेल तर जगायचे कशाला आम्हाला फाशी देवुन मारा अशा संतप्त भावना आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे मांडल्या. या वेळी इंजेक्शनची मागणी व पुरवठ्यावरून आमदार धस व जिल्हाधिकारी जगताप यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

शेवटी रेमडेसिवर इंजेक्शन प्रकरणीच्या तक्रारी पाहुन जिल्हाधिकारी जगताप यांनी तातडीने इंजेक्शन नियंत्रणाची सहाय्यक आयुक्त औषधे रामेश्वर डोईफाडे यांच्याकडील जबाबदारी काढून उपजिल्हाधिकारी प्रविन धरमकर यांच्याकडे दिली आहे.

बीड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांना रेमडेसीवरचे इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्णांचा मृत्यू होत असल्याने इंजेक्शनचा काळाबाजार रोखुन तातडीने गरजुंना इंजेक्शन उपलब्ध करा यामागणीसाठी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यासह, आमदार लक्ष्मण पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, यांच्यासह बहुजन वंचित आघाडीचे अशोक हिंगे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल हे गुरूवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमोर आक्रमक होत सर्वांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याची तक्रार केली. यावेळी आमदार सुरेश धस यांनी रमडेसिवीर इंजेक्शन का मिळत नाही अशी विचारणा करताच जिल्हाधिकारी जगताप यांनी इंजेक्शन देण्यात आले आहेत. तुम्ही जावुन पहा असे धस यांना सांगीतले. तेंव्हा धस यांनी आम्ही रोज तिथेच आहोत. तुम्ही एक तरी इंजेक्शन जिल्ह्यात वाटले का असा सवाल करत शिरूर रूग्णालयाला कुठे इंजेक्शन दिले ते दाखवा नाहीतर मी राजीनामा देतो, असे धस म्हणाले.

यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांनी बीडमध्ये येवुन कर्जत- जामखेडचे लोक इंजेक्शन घेवुन जातात अशी परिस्थीती आहे. तेंव्हा आमदार धस यांनी तुमचा डोईफोडे नावाचा माणुस हा रेड मारतो आणि इंजेक्शन गोळा करतो तो कोणाला इंजेक्शन देतो याची अधी चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकारी साहेब आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो काय ? की आष्टी व शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे का ? काय दाखवता तुम्ही अर्ज ? जिल्हाधिकारी साहेब आमच्यावर सरसकट गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाका. आम्हाला बाहेर जाण्यापेक्षा आम्हाला जेलमध्ये बसलेले परवडेल. यावेळी अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाशमी हे आमदार धस हे जिल्हाधिकाऱ्यांना बोलत असतांना मधे बोलले तेंव्हा धस संतापले त्यांनी तुम्ही का खोटे बोलता हाशमी व्हॉट इज थीस हाशमी चार चार दिवस रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नाहीत. तेंव्हा हाशमी यांनी आष्टीचे सहा अर्ज आल्याचे धस यांना सांगीतले. तेंव्हा आमदार धस यांनी तुम्हाला एकही अर्ज आष्टीचा येणार नाही. लोकांना दवाखान्यात इंजेक्शन पाहीजेत तुमच्याकडे अर्ज घेवुन आज कोण येईल. स्वाक्षऱ्या करून दिल्या तरी इंजेक्शन दिले जात नाहीत. रक्ताचे नाते विचारले जाते हा काय प्रकार आहे. बीडमध्ये एका मेडीकल दुकानदाराने ८० रेमडेसिवर इंजेक्शन बेकायदेशीरपणे कोणाला वाटले याची तुम्ही चौकशी करावी.अशी मागणीही उपस्थीतीतांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तेंव्हा रेमडेसीवीर इंजेक्शनवर जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण पाहीजे अशी मागणी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...