आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु व डीवायएसपी राहुल आवारे यांच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला, किराणा मालासह विविध वस्तू लंपास

पाटोदा4 महिन्यांपूर्वीलेखक: महेश बेदरे
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु व डीवायएसपी राहुल आवारे यांच्या पाटोदा शहरातील नव्यानेच सुरु झालेल्या आर. के. मार्ट या सुपर मार्केट शॉपीवर रविवारी मध्यरात्री चोरटयांनी डल्ला मारत आतील किराणा सामानासह विविध वस्तु लंपास केल्या. दुकानातील सीसीटीव्हीचे किटदेखील चोरट्यांनी काढून नेले. विशेष म्हणजे रविवारीच राहुल आवारे यांचा पुण्यात लग्नसोहळा होता, त्यामुळे कुटुबातील सर्वच मंडळी या लग्नासाठी पुण्यात होती. याचाच फायदा चोरटयांनी घेतला दुकान लुटले.

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु राहुल आवारे हे पाटोद्याचे भुमिपुत्र आहेत. त्यांनी पाटोदा शहरात अवघ्या दोनच दिवसांपुर्वी जामखेड मुख्य रोड परीसरात आर.के. मार्ट ही सुपर मार्केट शॉपी सुरु केली आहे. मोठया थाटात या शॉपचे उद्धाटन करण्यात आले होते. रविवारी डीवायएसपी राहुल आवारे यांचा पुण्यात विवाह सोहळा होता. यासाठी संपुर्ण आवारे कुटुंब पुण्यात होते. हाच डाव अज्ञात चोरटयांनी साधला व पहाटे अंदाजे 2.30 ते 3 च्या दरम्यान मार्टचे कुलुप तोडत आत प्रवेश केला.

चोरट्यांनी प्रथम येथील सीसीटीवी किट डीव्हीआर सह तोडले आणि नंतर दुकानातील सर्व ड्रायफुट, इतर वस्तू, काॅस्मेटीक सह माल लंपास केला. सोमवारी सकाळी ही घटना ऊजेडात आली व त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांना याची माहीती कळताच एपीआय महेश आंधळे, पीएसआय ए.टी. पठाण , यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील सीसीटीवीच गायब झाल्याने आता या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, आजुबाजुच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे काही माग लागतो आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...