आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी आत्महत्यांमुळे भलेही महाराष्ट्र बेजार असेल, परंतु राज्य विधानसभेत सर्वाधिक म्हणजे २८८ पैकी १०४ शेतकरी आमदार आहेत. म्हणजेच या आमदारांचा मूळ व्यवसाय अर्थात उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच आहे. शेतीपाठोपाठ ९७ आमदार व्यापारी, तर ७ जण वैद्यकीय पदवीधारक डॉक्टर, तिघे वकील आणि ५० आमदार चक्क सामाजिक कार्यकर्ते आहेत. “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हे लोकसंख्या नियंत्रणासाठीचे तत्त्व. परंतु, विधानसभेत तब्बल ७९ आमदारांना तीन किंवा तीनपेक्षा अधिक अपत्ये आहेत. दुसरीकडे ४७ आमदारांनी एकाच अपत्यावर कुटुंबनियोजन केल्याचाही आदर्श आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने आमदारांची ही वैयक्तिक माहिती संकलित करून ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. यात आमदारांचे शिक्षण, व्यवसाय, त्यांना असलेली अपत्ये, छंद आदी बाबींचा समावेश आहे.
सर्वच आमदारांना सामाजिक कार्यासोबत वाचनाचा छंद!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यवसायाने उद्योजक आहेत. कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिंदे यांना एक अपत्य आहे. त्यांना कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याचा छंद आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्यवसाय सामाजिक कार्य असून त्यांनी वकिली आणि
व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना एकच अपत्य आहे. त्यांना वाचन, कवितालेखनाचा छंद आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार वाणिज्य शाखेचे पदवीधारक असून त्यांचा व्यवसाय शेती आहे. दोन अपत्ये आहेत. पवारांना क्रिकेट, टेनिस व समाजकार्याची आवड आहे.
फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेले ४५ आमदार
दहावी 45
बारावी 19
पदविका 44
पदवीधारक 83
वैद्यकीय पदवी 07
अभियांत्रिकी पदवी 15
कायदा पदवी 20
शिक्षणशास्त्र पदवी 07
सामान्य पदव्युत्तर 16
वैद्यकीय पदव्युत्तर 03
व्यवस्थापन पदव्युत्तर 02
अभियांत्रिकीत पदव्युत्तर 04
एमफिल 01
पीएचडी 06
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.