आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित 9 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित पुण्याच्या अविरत चौहान व मुलींमध्ये नागपूरच्या वेदिका पालने विजयी घौडदौड कायम ठेवली. त्याचबरोबर अंबर गणवाल व आदित्य जोशी यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.
कलश मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या स्पर्धेत चौथ्या फेरी अखेर पहिल्या पटलावर अविरत (3 गुण) व मुंबई उपनगरच्या विहान अग्रवाल (3 गुण ) विरुद्ध सामन्यात सेंटर काउंटर या डावाने सुरुवात झाली. विहानची जी 4 खेळी आत्मघाती ठरली, त्याचा घोड मारला गेला. अवघ्या 26 चालीत अविरतने विहानला पराभूत केले. दुसरीकडे, मुंबईच्या हित बलदवाने औरंगाबादच्या रियार्थ पोदारला, प्रभु अर्जुनने राजयन लोहाडे आणि कोल्हापूरच्या सोनी विवानने औरंगाबादच्या ऋग्वेद पोतदारला पराभूत केले.
यजमान भूमिका वाघळेला पराभवाचा धक्का
मुलींमध्ये नागपूरच्या अव्वल मानांकित वेदिका पालने यजमान औरंगाबादच्या भूमिका वाघळेला पराभवाचा धक्का दिला. वेदिका व भूमिकेच्या डावाला फोर नाईटस प्रकाराने सुरुवात झाली. वेदिकाच्या ब 5 खेळीमुळी भूमिकाचा घोडा कोपऱ्यात अडकला. महत्वाचे दोन मोहरे निकामी झाल्याने भूमिकाला खेळण्यास अधिक वाव मिळाला नाही. तिच्या आक्रमकतेवर बंधने आली. आपल्या अनुभवाच्या जोरावर वेदिकाने विजय मिळवला. या स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, सतीश ठाकूर, पुष्कर डोंगरे, प्रीती समदाणी हे काम पहात असून केतन अवलगावकर, अभय दैठणकर, सुधीर सिंगेवार हे मदत करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.