आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्च:राज्यात दहावीतील सरासरी 12 टक्क्यांवर विद्यार्थी दरवर्षी मराठीमध्येच होतात नापास

औरंगाबाद |डॉ. शेखर मगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अवघड वाटतो. पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची २०१८ ते २०२० दरम्यानची ३ वर्षांची आकडेवारी तपासली तर इंग्रजीच्या खालोखाल मराठीत नापास होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात सरासरी दरवर्षी ११.९४% विद्यार्थी मराठीत नापास होतात. इंग्रजीतील नापासांचे प्रमाण १४.९२ टक्के आहे.

राज्यातील कोणत्या विभागात काय आहे परिस्थिती
1 नागपूर विभागात इयत्ता दहावीत सर्वाधिक २२.५७% विद्यार्थी मराठीत, इंग्रजीत १५.०६% नापास आहेत. अमरावतीत १४.३३%, मुंबई १३.०३%, कोकणात ४.२५% मुले मराठीत नापास झाली. लातूर विभागात मराठीत १२.१३%, तर इंग्रजीत १३.५८% मुले नापास झाली.

तीन वर्षांत ३७ लाख ८१,६६३ विद्यार्थ्यांनी मराठीची परीक्षा दिली. ३३ लाख ३०,०१९ पास झाले. ४ लाख ५१,६४४ नापास झाले. या तीन वर्षांत इंग्रजीच्या परीक्षेला ४१ लाख ४३,४८३ मुले बसली. त्यापैकी ३६ लाख ६२,८९७ मुले उत्तीर्ण, तर १४.९२% नापास.

2 पुणे विभागात दहावीत मराठीत नापासांचे प्रमाण ८.३५% तर इंग्रजीत ९.०५% जण नापास झाले. कोल्हापूर विभागात इंग्रजीत ७.०९%, तर मराठीत नापास होणाऱ्यांचे प्रमाण ५.७९% आहे.

3 नाशिक : ११.७८% विद्यार्थी मराठीत फेल आहेत. इंग्रजीत ११.४०% विद्यार्थी नापास झाले. औरंगाबाद विभागात १०.८७% विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण, तर इंग्रजीत ११.८९% नापास आहेत.

बारावीत उलट परिस्थिती
इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांची मात्र उलट परिस्थिती आहे. नाशिक विभागात इंग्रजीत १४.५७%, तर मराठीत ३.०९% विद्यार्थी फेल आहेत. पुण्यातील बारावीचे १.९८% विद्यार्थी मराठीत नापास झाले. इंग्रजीत नापासांची संख्या ५ पट असून त्याचे प्रमाण १०.०७ %, ऐवढे आहे. कोल्हापूर २.०२ %, मराठीत तर इंग्रजीत १०.०२ %, नापास आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीतील नापासांचे प्रमाण १४.९२ टक्के
राज्य बोर्डाच्या २०१८ ते २०२० दरम्यानच्या ३ वर्षांच्या आकडेवारीतील माहिती

बातम्या आणखी आहेत...