आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची नासाडी:ऐन उन्हाळ्यात टंचाई गेवराई तांडा येथे जलवाहिनीला लागली होती गळती, 30 लाख लिटर पाण्याची नासाडी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणी टप्पा 12 तासांनी वाढला

शहराची तहान भागवणारी मुख्य जलवाहिनी गेवराई तांडा येथे ५ एप्रिल रोजी फुटल्यामुळे सुमारे ३० लाख लिटर पाणी वाया गेले. महापालिकेने तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला, मात्र त्यामुळे जुन्या शहरातील काही भागासह सिडको-हडको परिसरातील जलकुंभांवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठ्यावर गुरुवारी परिणाम झाला. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने आता ऐन उन्हाळ्यात संपूर्ण शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडणार असून, सुमारे १२ तास पुढे ढकलले जाऊ शकते.

नव्या जलवाहिनीच्या कामादरम्यान गेवराई तांडा येथे बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हला धक्का लागला. त्यामुळे जलवाहिनी फुटली व मोठी गळती लागली. जलवाहिनीतून सुमारे ३० लाख लिटर पाणी वाया गेले. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता मनोज बाविस्कर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्री दहापर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती केली व पाणीपुरवठा पूर्ववत केला. या कामासाठी सुमारे सहा तासांचा वेळ लागला. त्यामुळे शहागंज, मरीमाता, सिडको व हडकोतील जलकुंभांना पाणीपुरवठा करता आला नाही. परिणामी या जलकुंभांवर अवलंबून असलेल्या परिसरातील काही भागाला गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तर काही भागांत कमी दाबाने पाणी पुरवल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

वेळापत्रक कोलमडणार शहरात ६० जलकुंभ आहेत. बुधवारी शहागंज, मरीमाता, सिडको व हडकोतील जलकुंभांना पाणी देण्यात येणार होते. जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा सहा तास बंद होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या जलकुंभांना पाणी देण्यात आले. त्याचबरोबर अन्य जलकुंभांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या वेळा किमान ६ ते ८ तासांनी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सुमारे १२ तासांनी पुढे ढकलले जाणार आहे.

आमचे नियोजन बिघडले आज पाणी न आल्यामुळे घरातील सर्वच कामे रखडली. धुणी-भांडी, स्वयंपाक, पिण्यासाठी सर्वच गोष्टींना पाणी आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत चार दिवसांआड पाणी येते आहे. त्यातही आठवड्यात एकदा जरी गॅप पडला तर नियोजन कोलमडतेे. - संजीवनी ढेरे, गृहिणी, हडको गृहिणींची होतेय कसरत आधीच पाचव्या दिवशी पाणी येते. त्यामुळे पुढच्या पाच दिवसांचे नियोजन पाणी भरताना करावे लागते. आज पाणी न आल्यामुळे मोठी गैरसोय झाली. एखाद्या आठवड्यात पाणी ठरलेल्या वेळी आले नाही, तर गृहिणींना जास्त कसरत करावी लागते. - मीना सोनवणे, गृहिणी, हडको

जलवाहिनीतून रस्त्यावर उडणारे पाणी जेसीबीने थोपवले. शहागंज, सिडको-हडकोतील पाणीपुरवठा विस्कळीत पाणीपुरवठ्यावर ८ ते १२ तासांचा परिणाम जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. काल मुख्य जलवाहिनी बंद असल्याने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. पाण्याच्या वेळा ८ ते १२ तास पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. - के. एम. फालक, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा