आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागरण मोहीम सुरू:केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात बालविवाह जास्त‎, महिला व‎ बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची कबुली

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बाल विवाह विरोधात‎ जनजागरणाची मोहीम जोरदारपणे सुरू‎ आहे. विशेषत: आदिवासी बहुल‎ जिल्ह्यांवर सरकारी यंत्रणेने लक्ष केंद्रीत‎ केले आहे. जिल्हास्तरीय वरिष्ठ‎ अधिकारी या मोहीमेत सक्रिय झाले आहे.‎ या पार्श्वभूमीवर बाल विवाहाचे गुन्हे‎ आणि दोषारोपपत्र यांची माहिती‎ शोधण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला.‎ तेव्हा तीन वर्षांमध्ये म्हणजे २०१९ ते २०२१‎ या कालावधीत १३७ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र‎ न्यायालयात दाखल झाले असल्याचे‎ समोर आले.

विशेष म्हणजे केरळच्या‎ तुलनेत महाराष्ट्रात बाल विवाहाचे प्रमाण‎ अधिक असल्याची कबूली महिला व‎ बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी‎ दिली आहे.‎ मुंबईसारख्या शहरातही बालविवाह होत‎ आहेत. ते रोखण्यात शासकीय यंत्रणेला‎ ‎अपयश आले असल्याची बाब दोन‎ महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती. या‎ विषयी लोढा यांनी सांगितले की,‎ मुंबईमध्येही बाल विवाहाचे ६ प्रयत्न झाले हे‎ खरे आहे. पण ते सर्व हाणून पाडण्यात‎ आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार‎ केरळपेक्षा पुरोगामी महाराष्ट्रात‎ बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. राज्य‎ शासनाने ३ जून २०१३ रोजी एक विशेष‎ अधिसूचना काढली. त्यानुसार राज्यातील‎ प्रत्येक ग्राम पंचायतीमधील ग्राम सेवकांना‎ त्यांच्या ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तर १८‎ ऑगस्ट २०१६ च्या अधिसूचनेन्वये नागरी‎ भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना‎ (नागरी) आपआपल्या संबंधित प्रकल्प‎ क्षेत्रावर बालविवाह प्रतिबंध अधिकारी‎ म्हणुन नियुक्त केले आहे नॅशनल क्राईम‎ रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी)‎ अहवालात असे म्हटले आहे की, २०१९,‎ २०२० व २०२१ मध्ये बालविवाह प्रकरणी‎ दाखल करण्यात आलेल्या एकूण १५२‎ गुन्ह्यांपैकी १३७ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र‎ न्यायालयात दाखल झाले. त्यापैकी १३६‎ गुन्हे न्यायप्रविष्ट असून १ गुन्हा दोषमुक्त‎ आहे. १० गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे,‎ असे लोढा यांनी सांगितले.‎

तीन वर्षांत १६ जिल्ह्यात १८ वर्षांखालील १५२५३ माता‎ ‎ गेल्या तीन वर्षात सोळा आदिवासी जिल्ह्यात १८ वर्षाखालील मुली माता झाल्याची संख्या‎ १५२५३ असल्याचे या विषयी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या‎ अहवालात आढळून आले आहे. तथापि, काही आदिवासी जमातीमध्ये काही रुढी परंपरा‎ असल्याने त्यांचे बालविवाह झाले अथवा नाही याचा बोध होत नाही, असे लोढा यांनी‎ विधीमंडळ अधिवेशनातील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.‎ तीन वर्षांत १६ जिल्ह्यात १८ वर्षांखालील १५२५३ माता‎ ‎ गेल्या तीन वर्षात सोळा आदिवासी जिल्ह्यात १८ वर्षाखालील मुली माता झाल्याची संख्या‎ १५२५३ असल्याचे या विषयी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या‎ अहवालात आढळून आले आहे. तथापि, काही आदिवासी जमातीमध्ये काही रुढी परंपरा‎ असल्याने त्यांचे बालविवाह झाले अथवा नाही याचा बोध होत नाही, असे लोढा यांनी‎ विधीमंडळ अधिवेशनातील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.‎