आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फुलंब्री:राज्यात दोन वेगवेगळ्या घटनांत 9 जणांचा बुडून मृत्यू, शेततळ्यात 4 सख्ख्या भावांचा मृत्यू

भोकरदन/तळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री तालुक्यात तळेगाववाडीतील याच तलावात मंगळवारी बुडून ५ मुलींचा मृत्यू झाला.
  • एकीला वाचवताना दुसरी बुडाली, त्यांना पाहून तिघी पाण्यात उतरल्या
Advertisement
Advertisement

राज्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या घटनांत ९ जणांचा बुडून मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील तळेगाववाडी येथे पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत गेलेली सहावी मुलगी बचावली. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यात दोन सख्ख्या बहिणी तर तीन चुलत बहिणी होत्या.

ही घटना घडली तेव्हा या मुलींचे आई-वडील शेतात काम करीत होते. एक मुलगी तलावात पडल्यानंतर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघीजणी बुडाल्याचे सांगितले जात आहे. आशुबी पठाण (६), नबिबाबी पठाण (६), अल्फिदाबी पठाण (७), सानियाबी पठाण (६), शब्बुबी पठाण (५) अशी मृत मुलींची नावे आहेत.

एकीला वाचवताना दुसरी बुडाली, त्यांना पाहून तिघी पाण्यात उतरल्या

तलावात कपडे धुऊन आल्यानंतर सहाही मुली वस्तीवर आल्या. त्यानंतर अंघोळीसाठी त्या परत तलावावर गेल्या. पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एक मुलगी तलावात बुडाली. तिला वाचविण्यासाठी दुसरीने प्रयत्न केला असता तीसुद्धा बुडाली. या दोघी बुडत असल्याचे दिसताच इतर तिघींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाचही मुली त्यात बुडाल्या. सहाव्या मुलीने लागलीच वस्तीवर धाव घेत या प्रकाराची माहिती दिली. पाचही मुलींना अत्यवस्थ अवस्थेत बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी तत्काळ फुलंब्रीकडे रवाना करण्यात आले. मात्र, वाटेतच पाचही मुलींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

श्रीगोंदे : शेततळ्यात 4 सख्ख्या भावांचा मृत्यू

श्रीगोंदे | तालुक्यातील बाबुर्डी येथे मंगळवारी पोहायला गेलेल्या चार सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील मजूर आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथे एका शेतकऱ्याच्या गुऱ्हाळावर काम करतात. त्यातील मोहंमद सलीम शेख यांच्या कुटुंबातील मुले आई-वडिलांना न सांगता शेततळ्यात पोहोण्यासाठी गेले. शेततळ्यात उतरताना त्यांनी ठिबकच्या पाइपचा आधार घेतला होता. मात्र, तो पाइप ओझ्याने तुटल्याने मुले पाण्यात पडली. अरबाज (२०), फैजल (१८), दानेश (१६), नावजिश (१४) या चाैघांचा बुडून मृत्यू झाला.

Advertisement
0