आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमतमध्ये आणखी आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, मुंबई येथून आले होते मजूर

वसमतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्हयाची कोरोना बाधीतांची संख्या 15 झाली

वसमत येथे मुंबई येथून आलेले 8 मजूर कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यांचा अहवाल रविवारी (17 मे) शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला आहे. या रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. आता हिंगोली जिल्हयाची कोरोना बाधीतांची संख्या 15 झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 91 वर पोहोचल्यानंतर प्रशासनाने कडक उपाय योजना राबविल्या आहेत. त्यानंतर ही संख्या 7 वर आली होती. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशीक या भागातून गावाकडे परत येणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे. या मजुरांची संभाव्य संख्या लक्षात घेता शाळा व इतर शासकिय इमारती देखील ताब्यात घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शहरी भागातून रुग्णालय व इतर खाजगी इमारतींमधे क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले. तर ग्रामीण भागातून शाळांमधे क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, वसमत तालुक्यातील वापटी येथील काही मजूर मुंबई येथून 14 मे रोजी वसमत येथे आले होते. एका ट्रकमधून आलेले मजूर थेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून त्यामध्ये 8 जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. सध्या शासकिय रुग्णालयात 1, औरंगाबाद येथे 6 रुग्ण असून त्यानंतर आता 8 जण पॉझीटिव्ह आल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्याची रुग्ण संख्या 15 वर पोहोचली आहे.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार यांच्या पथकाने वसमतकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक वापटीला रवाना

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांचे पथक आज तातडीने वापटी येथे रवाना झाले आहे. मुंबई येथून आलेल्या मजूरांपैकी काही जण गावात गेले होते काय याची शाहनिशा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही जण गावात गेले असतील तर त्यांचा कोणाशी संपर्क आला का याची पडताळणी करून त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये आणले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...