आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत शिक्षकांना अपुरे वेतन; जगण्यासाठी चालक, वेटरची अर्धवेळ नोकरी करण्याची वेळ

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कमी वेतनामुळे शिक्षकांना आपला पेशा सोडावा लागत आहे. ते इतर नोकऱ्यांचा शोध घेऊ लागले आहेत. त्याद्वारे जास्त कमाई करून उदरनिर्वाह करता येऊ शकेल. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सात वर्षांपासून अध्यापन करणाऱ्या एलिसन हाले म्हणाल्या, हॉटेल, सलून, सुरक्षा एजन्सी इत्यादी क्षेत्रात काम करून लोक जास्त उत्पन्न कमावू लागले आहेत. शिक्षकांना दोन-तीन नोकरी करण्याची वेळ आली आहे. ते अध्यापनाबरोबरच आइस्क्रीम शॉप, किराणा डिलिव्हरी, कॅब ड्रायव्हर, वेटरसारखी कामे करू लागली आहेत. त्यासाठी ते दररोज १० तासांहून जास्त वेळ देत आहेत.

अमेरिकेत दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत शिक्षकांचे वेतन १० टक्के कमी झाले. उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडला आहे. अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार निम्म्यांहून जास्त शिक्षक या पेशातून बाहेर पडण्यासाठी नव्या नोकरीचा शोध घेत आहेत. त्याचा फटका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. कारण शाळेत त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. शिक्षकाविना वर्गाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. कमकुवत शिक्षण व्यवस्थेबद्दल राजकीय नेत्यांना जबाबदार ठरवले जात आहे. शाळांना पुरेसा निधी मिळालेला नाही. कोविडच्या काळात शाळांची उपेक्षा करण्यात आली आहे.

कर्मचारी घटल्याने शिक्षकांवर अतिरिक्त भार इंडियाना प्रांताचे ज्युनियर हायस्कूलमध्ये काैन्सिलर राहिलेल्या अॅना सुटर म्हणाल्या, सहकारी शिक्षकांनी नोकरी सोडल्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामे करावी लागत आहेत. क्षमतेपेक्षा ४-५ पटीने जास्त काम केल्यामुळे खासगी जीवनावर त्याचा परिणाम होत होता. शेवटी कंटाळून मीही नोकरी सोडून दिली.

बातम्या आणखी आहेत...