आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर वंदे मातरम सभागृहाचा शुक्रवारी उद्घाटन सोहळा:उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

४० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ मिळत नसल्याने ६० दिवसांपासून लांबले असल्याचे वृत्त दिव्य मराठीने १३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. त्यामुळे शासकीय यंत्रणेत एकच धावपळ उडाली आणि शुक्रवारी म्हणजे ९ डिसेंबर रोजी या सभागृहाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड तसेच अन्य मंत्री, खासदारांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...