आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:एमआयटीच्या टेनिस कोर्टचे उद्घाटन; क्रिकेटसह इतर खेळ देखील महत्त्वाचे असल्याने शर्मा यांच्या कल्पनेतून हे मैदान उभारण्यात आले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथे दोन क्ले कोर्ट बनवण्यात आले आहेत. क्रिकेटसह इतर खेळ देखील महत्त्वाचे असल्याने शर्मा यांच्या कल्पनेतून हे मैदान उभारण्यात आले.

येथे सकाळी ६.३० ते ९.३० व सायंकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान टेनिस प्रशिक्षक किशोर घाडगे खेळाडूंना मार्गदर्शन करतील. ‘खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. क्रिकेटप्रमाणे काही गरीब खेळाडूंना आम्ही मोफत टेनिसचे प्रशिक्षण देऊ, असे मुनीष शर्मा यांनी म्हटले.’

मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. संतोष भोसले, डॉ. नीलेश पाटील, प्राचार्य डॉ. अशोक रोडगे, रजिस्ट्रार सचिन लोमटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास त्रिभुवन, सुरेश जाधव, प्रीतेश चार्ल्स, पंकज पेंडकर, शंकर लबडे, गौरव जोशी आदींनी पुढाकार घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...