आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारमार्फत उभारण्यात येत असलेल्या परशुराम कुंड प्रकल्पामध्ये लोकवर्गणीतून भगवान परशुरामांची ५१ फूट उंचीची पंचधातूची मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने १२ ते २६ जूनदरम्यान जनजागृती पंधरवड्याचे उद्घाटन गारखेडा येथील आजुबाई देवी मंदिर व सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज उपासना केंद्रात झाले. अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे कोषाध्यक्ष आर.बी.शर्मा होते. प्रास्ताविक करताना विप्र फाउंडेशनचे उपाध्यक्ष सी.एम.शर्मा म्हणाले, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४० कोटी निधी मंजूर केला आहे. मूर्ती बनवण्यासाठी ११ कोटी निधी लोकसहभागातून उभा करणे आवश्यक आहे. भागवताचार्य विजयकुमार पल्लोड, डॉ.सतीश उपाध्याय, राजेश बुटोले, मिलिंद दामोदरे, विजया अवस्थी यांनीही विचार मांडले. या वेळी प्रकाश चोबे यांनी २१ हजार, सुभाष देशपांडे यांनी ११ हजार, सतीश जोशी, नंदकुमार ठाकरे, मिलिंद दामोदरे यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली. कल्लोळतीर्थ अन्वा येथील सोनू महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या या कार्यक्रमास विजयकुमार गौड, अनिल मुळे, मधुकरराव देशपांडे, जीवनगुरू भोगावकर, विजया पंचारिया, चित्रा मुरलीधर कापरे, किशोर उपाध्याय, शंकरलाल खटोड, परीक्षित शर्मा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन जोशी, तर दिनकर लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सतीश जोशी, सुधाकर भाले, किशोर गोसावी, विनायक जोशी, शशिकांत गोरवाडकर,शैलेश जोशी, शशिकांत रत्नपारखी, रंगनाथ चोबे, उमेश जोशी, दिवाकर राणे, विलास पूर्णपात्रे आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.