आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतनीकरण:संत तुकाराम नाट्यगृहाचे महाराष्ट्रदिनी लोकार्पण

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

िसडकाेतील संत तुकाराम नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यावर तीन कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. १ मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण केले जाणार आहे.संत तुकाराम नाट्यगृहाचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यानंतर अनेक वर्षांपासून हे नाट्यगृह बंद होते. नंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्याच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी तीन कोटींची तरतूद केल्यानंतर डिसेंबरमध्ये काम सुरू झाले. नाट्यगृहाचे सीलिंग, खुर्च्या, वातानुकूलन यंत्रणा, रंगमंचावरील विविध कामे वेगाने सुरू आहेत.

हे नाट्यगृह नाट्यकर्मींसाठी आदर्श ठरावे अशा स्वरूपात काम करावे, नाट्यप्रेमींना उत्कृष्ट अनुभव यावा, संत एकनाथ रंगमंदिराप्रमाणेच हे नाट्यगृह तयार व्हावे यासाठी नाट्यगृहातील ध्वनिक्षेपक, प्रकाश व आसन व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा उच्च दर्जाच्या असाव्यात, अशा सूचना डॉ. प्रा. दिलीप घारे यांनी केल्या हाेत्या. आता लवकरच काम पूर्ण हाेईल, असे समन्वयक इम्रान खान यांनी सांगितले. मे महिन्यात याचे लोकार्पण करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...