आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याचा संशय:डोक्यावर फावडे मारून पत्नीचा खून, पैठणची घटना; पती फरार, पोलिसांकडून शोध सुरू

पैठण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणमधील संतोषी माता मंदिराजवळ पॉवर हाऊस आंबेडकर चौक येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे घालून खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मंदाबाई ज्ञानेश्वर पोळ (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ व मंदाबाई यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मद्यपी ज्ञानेश्वर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. सतत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही त्याने अनेकदा दिली होती. त्यामुळे मंदाबाई या ३ वर्षांपासून नेहरू चौक भागात माहेरी राहत होत्या. मंदाबाई मंगळवारी सकाळी ७.३० वाजता कामाला जाण्यास निघाल्या. नेहरू चौकाजवळ मद्यधुंद अवस्थेतील ज्ञानेश्वरने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. ज्ञानेश्वरने पत्नीच्या डोक्यात फावडे घातले. यामुळे मंदाबाई जागेवर कोसळल्या. खून करून ज्ञानेश्वर फरार झाला.

बातम्या आणखी आहेत...