आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना, मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीतील घटना; दोन आरोपींना अटक

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली.

मुकुंदनगर परिसरात राहणाऱ्या आजीकडे १५ वर्षीय पीडिता नेहमी जात असे. यातून तिची त्याच परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण ऊर्फ अक्षय गाेविंद दराडे (२१, रा. मुकुंदनगर) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर लक्ष्मणने प्रेमाचे नाटक करत तिला लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२२ दरम्यान तिच्यावर अत्याचार केले. त्यातून १५ वर्षांची पीडिता आठ महिन्यांची गरोदर राहिली. त्यामुळे लक्ष्मण लग्न करण्यासाठी तयार झाला, मात्र पीडितेला रुग्णालयात नेल्याने पोलिसांना माहिती कळाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत १४ वर्षांच्या पीडितेवर ऑगस्ट २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आरोपी अमोल सुभाष पवार (२७, रा. संजयनगर गल्ली नंबर ९) याने वारंवार अत्याचार केले. अमोल विवाहित असून त्याला दोन मुले आहेत तरीही त्याने पीडितेला फूस लावून तिच्यावर अत्याचार केले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली.

बातम्या आणखी आहेत...