आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव कंटेनरने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार अनिल साहेबराव गायकवाड ( वय 35) हा तरुण चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला रामदास राऊत (वय 24) हा दूर फेकला गेल्याने थोडक्यात बचावला. ही घटना गुरुवारी (28 जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
मध्यरात्री झाला अपघात
दुचाकीस्वार अनिल गायकवाड व रामदास हे दोघे मित्र दुचाकीवर बसून (एम.एच.20,ए.व्ही.4070) 28 जुलै रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास औरंगाबाद - नगर महामार्गाने वाळूजकडून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. त्यांची दुचाकी वाळूज येथील मच्छीमार्केटसमोर येताच औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या गॅसकंटेनरने (एम.एच.04, ए.व्ही.3878) समोरील दुचाकीला ओहरटेक करण्याच्या नादात गायकवाडच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिल हा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला रामदास राऊत हा रस्त्यावर फेकला गेल्याने तो किरकोळ जखमी झाला. अपघाताची घटना घडतात परिसरातील अशोक आरगडे, नितीन साबळे आदी नागरिकांनी धाव घेत बेशुद्धावस्थेतील गायकवाड व जखमी झालेल्या राऊत या दोघांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले. तर रामदासवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
टँकरचालका विरोधात गुन्हा दाखल
भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने समोरील दुचाकीस्वार सोमनाथ वाल्मिक साबळे याच्या दुचाकीला कट मारत ओव्हरटेक केले. अतिशय वेगात असणारे कंटेनर दुचाकीला ओव्हरटेक करून गेल्याने घाबरलेला सोमनाथ जागीच थांबला. पुढच्याच क्षणी याच कंटेनरने समोरील दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यातच निष्पाप अनिलचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोमानथ साबळे यांच्या फिर्यादीवरुन टँकरचालक हरिनाथ बाबुराव सानप (रा.दैठाणाघाट ता.परळी, जि.बीड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.