आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक सतीश व्यास यांच्या घरी 'आयकर'चे छापे?:औरंगाबादमधील निवासस्थानासह तीन ठिकाणी झाडाझडती, इतरही रडारवर

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये बुधवारी आयकर विभागाने चार ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येतेय. त्यात एका बड्या उद्योजकाचा समावेश असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश व्यास असे त्यांचे नाव आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यास यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही.

ज्योतीनगर येथील त्यांच्या निवास्थानी आयकर विभागाचे पथक झडती घेत असल्याची माहिती समोर येतेय. व्यास यांच्या निवास स्थानासह इतर तीन ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्याची माहिती आहे.

नेमके प्रकरण काय?

औरंगाबादेत बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाची मोठी कारवाई झाली आहे. सहकार नगर भागात 7 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. आय टी विभागाची मोठी टीम यामधे काम करत आहे. अद्याप नेमकी किती लाखांची रक्कम हाती लागली याबद्दल बोलण्यास कुणीही तयार नाही.

मिथून व्यास सेनेतच

सकाळी चार वाजेपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असली तरी, नेमकी कारवाई कशासाठी आहे किंवा कोणत्या बाबतीत आहे. याची स्पष्टता अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, व्यास कुटुंबीय हे आधीपासून शिवसेनेच्या जवळीक असलेले कुटुंब मानले जाते. सतीश व्यास यांचे पुत्र मिथून सतीश व्यास हे युवासेनेचे जिल्हा चिटणीस पदावर कार्यरत आहेत.

तपशील हाती नाही

शिंदेंगटात शहरातील अनेक नेते दाखल झाले. मात्र, मिथून व्यास हे ठाकरेंच्या शिवसेनेत कायम आहे. यानंतर त्यांच्या घरी छापा पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळपासून घराबाहेर पोलिस तैनात करण्यात आले असून यात महिला पोलिस कर्मचारी देखील उपस्थित आहेत. मात्र याबाबत अद्याप तपशील आयकर विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिलेला नाहीये.

बातम्या आणखी आहेत...