आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:अपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष उघड करू नयेत

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅन्सेटच्या अलीकडील अध्ययनातून १२ अंश सेल्सियसपेक्षा कमी किंवा २१ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान लोकांना अधिक आक्रमक बनवते, असा निष्कर्ष निघतो. यासाठी अमेरिकेतील ७७३ शहरांतील ४०० कोटी ट्विटचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनाचा निष्कर्ष असा की, लोक १२-२१ अंश तापमानात किंवा वातानुकूलित वातावरणात राहतात तेव्हा द्वेष व्यक्त करणाऱ्यांची संख्या कमी होते. या संशोधनाचे बहुआयामी परिणाम होतील. उष्ण प्रदेशातील लोक अधिक आक्रमक असतात किंवा थंड प्रदेशातील लोक अधिक शांत असतात असा याचा अर्थ होतो का? त्यामुळे गुन्हे न्यायशास्त्राचा चष्मा बदलेल का आणि न्यायमूर्ती निकाल देण्यापूर्वी कोणत्या भौगोलिक क्षेत्रात अशा प्रकारची हत्या झाली किंवा गुन्हेगार हा गुन्हा घडण्यापूर्वी त्याच्या नियंत्रणात नसलेल्या तापमानात होता का, हे पाहतील?

कदाचित लॅन्सेटने या संशोधनाचे निष्कर्ष विस्तृत पुनरावलोकनाशिवाय प्रकाशित केले आहेत. प्रत्येक सह-संबंध (को-रिलेशन) हे कार्यकारण संबंध असतातच असे नाही. असे झाले असते तर उत्तर भारतात मे-जूनमध्येच दंगली झाल्या असत्या, डिसेंबर किंवा जानेवारीत नव्हे किंवा थंड प्रांतात नव्हे तर फक्त खूप तापमान असलेल्या राज्यांमध्ये झाल्या असत्या. वाळवंटाचे तापमान दिवसा जास्त आणि रात्री कमी असते, तर संध्याकाळी हिंसाचार होत नाही का? कदाचित अशा संकुचित दृष्टिकोनातून गुन्हेगारीकडे पाहणे ही एक गंभीर चूक असेल, कारण या समाजशास्त्रीय तत्त्वांवरूनच गुन्हेगारी न्यायशास्त्र आणि त्याचे कायदे तयार केले जातात. म्हणून दोन घटकांच्या संगतीमुळे त्यांच्यातील अपरिहार्य संबंध गृहीत धरणे पूर्णपणे चुकीचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...