आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत सुविधा:विद्युत साहित्याच्या दरसूचीत वाढ ; वेळोवेळी दरसूची जाहीर

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधा उभारणीची कामे नियमितपणे करावी लागतात. या कामांसाठी लागणाऱ्या विविध तांत्रिक साहित्याच्या दरसूचीत (कॉस्ट डाटा) वाढ करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विद्युतीकरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतात. या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी महावितरणकडून वेळोवेळी दरसूची जाहीर केली जाते. मात्र, कोरोनानंतर आता विद्युतीकरणासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत २०१९-२० या वर्षांची म्हणजे करोनापूर्वीची दरसूची या कामासाठी लागू आहे. सध्या लागू असलेल्या दरसूचीत वाढ करण्याची मागणी विविध स्तरांवरून केली होती. महावितरणने दरसूची अद्ययावत करण्यासाठी एका समितीची स्थापना करून या समितीने दरसूचीत बदल करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...