आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Increase Mosambi Production Per Hectare Five Times, Insists The Collector; At Present It Is Possible To Increase Production From 8 Tonnes To 40 Per Hectare| Marathi News

कार्यशाळा:मोसंबी उत्पादन हेक्टरी पाच पट वाढवा, जिल्हाधिकाऱ्यांचा आग्रह ; सध्या हेक्टर 8 टन उत्पादन ते 40 वर नेणे शक्य

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. ती बाजारपेठेमध्ये कच्चा मालाच्या स्वरुपात नेण्यापेक्षा प्रक्रिया करुन विकल्यास चांगली किंमत मिळेल. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. सध्या दर हेक्टरी ८ ते १० टन उत्पादन होते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते ४० टनांपर्यंत न्यावे, असा आग्रहही त्यांनी केला.

महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी हा आग्रह धरला.मराठवाड्यात मोसंबी उत्पादनात ५ जिल्हे अग्रेसर असून ४८ हजार हेक्टर क्षेत्रातून सुमारे साडेचार लाख मेट्रीक टन उत्पादन घेण्यात येते. केंद्र सरकारनेही कृषी मालाची निर्यात दुप्पट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मोसंबीवर प्रक्रिया करुन विकल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात नक्कीच वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...