आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे:औरंगाबाद विभागातील सर्व शाळांनी 'निसर्ग सहलीचे' आयोजन करावे - केंद्रेकर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, निसर्गाच्या सानिध्यात राहून शिकण्याची संधी मिळावी, निसर्गात बागडता यावे, पक्षी, प्राणी, फळे, फुले, झाडे, वेली यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी. विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने औरंगाबाद विभागातील शाळांनी निसर्ग सहलीचे आयोजन करावे असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे.

निसर्ग सहलीचे आयोजन करत असतांना सहल ही निसर्गरम्य परिसरामध्ये आयोजित करावी. निसर्ग सहलीतून विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी, फळे, फुले, विविध वनस्पती, डोंगर, नद्या, टेकड्या त्यांची वैशिष्ट्ये इत्यादीची माहिती मिळू शकेल. सहली दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांनी बघितलेल्या प्राणी, फुलपाखरू, पक्षी, पाने, फुले, फळे, डोंगर, नद्या इत्यादीचे टिपण घेण्यास सांगावे. शक्य असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बिया, पाने, फळे, फुले इत्यादीचे नमुने गोळा करण्यास सांगावे. निसर्ग सहलीचे आयोजन 16 ते 21 जानेवारी 2023 या दरम्यान करावे.

कविता गाने सादर करा

निसर्ग सहल पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून सहलीचा अहवाल लिहून घ्यावा. निसर्ग सहली दरम्यान विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद अनुभव द्यावा. सहली दरम्यान भेट दिलेल्या जागेचे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पटवून द्यावे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी छोट्या कविता, गाणे, गोष्टी, कथा, नकला इत्यादीचे आयोजन करावे. सहली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घ्यावी. सहल शक्यतो शाळेपासून जवळ असलेल्या निसर्गरम्य परिसरात आयोजित करावी. सहली दरम्यान अनुभवत असलेल्या विविध गोष्टींचे ज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करुन द्यावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काही निवडक निसर्ग सहलींना भेटी देऊन मार्गदर्शन करावे.

विद्यार्थ्यांनी लिहावा अहवाल

निसर्ग सहलींचा अहवाल शाळांनी काही निवडक छायाचित्रांसह गटशिक्षणाधिकारी कार्यालयास व गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा. शिक्षणाधिकारी यांनी अहवाल निवडक छायाचित्रांसह विभागीय आयुक्तालयास 31 जानेवारी, 2023 पर्यंत सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...