आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा एजंट संघटनेची मागणी:60लाख विमाधारकांचा बोनस वाढवा, कर्जाचा व्याजदर घटवा ; अन्यथा आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागातील ६० लाख विमा ग्राहकांचा बोनस वाढवा, विमा हप्त्यांवर लावलेला जीएसटी रद्द करा तसेच पॉलिसी कर्जाचा व्याजदर कमी करा या मागण्यांसाठी विभागातील ११ हजार विमा एजंटांनी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे मागण्या मांडल्या आहेत. एका बैठकीत याबाबत चर्चा करून त्याचे निवेदन सादर करण्यात आले, अशी माहिती बिना चावला यांनी दिली. ग्राहकांच्या फायद्याचे बदल शासनाने केले पाहिजेत यासाठी सर्वांचे भविष्य सुरक्षित करणाऱ्या विमा एजंटांचे भविष्यही सुरक्षित झाले पाहिजे. यासाठी ग्रॅच्युइटी वाढावी, ग्रुप मेडिक्लेम विमा प्रतिनिधींनाही मिळावा, ग्रुप इन्शुरन्स वाढवावा, कमिशन वाढवण्यात यावे या प्रमुख मागण्याही त्यांनी मांडल्या.

भारतीय जीवन विमा निगमच्या ९८२ शाखांमध्ये विमा प्रतिनिधी लियाफी आणि इतर प्रतिनिधी संघटनांचा सहभाग आहे. मुख्य शाखाधिकारी रोशन मडामे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी विभागीय सदस्य अशोक अमृतकर, मुख्य मार्गदर्शक अण्णासाहेब आहेत. शाखाध्यक्ष सुनील क्षीरसागर यांची उपस्थिती होती. बैठकीला ३०० विमा प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महिला प्रतिनिधींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

विभागात ११ हजार विमा एजंट
औरंगाबाद विभागात लातूर, बीड, उस्मानाबाद औरंगाबाद जिल्हे येतात. यामध्ये ११ हजार विमा एजंट आहेत. जे ६० ते ७० लाख ग्राहकांना सेवा पुरवतात. बिना म्हणाल्या, आम्ही फक्त आमच्याच मागण्या घेऊन पुढे आलेलाे नाहीत, तर लाखो ग्राहकांना फायदा देणाऱ्या मागण्या अग्रस्थानी आहेत.

बातम्या आणखी आहेत...