आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्य:सामाजिक कार्य अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून द्या ; विद्यार्थी संघटनेची प्र-कुलगुरूंकडे मागणी

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे. १० सप्टेंबर स्पॉट अॅडमिशनसाठी अखेरचा दिवस आहे. सामाजिक कार्य अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त नाहीत. त्यामुळे मानव्य विद्याशाखेतील सामाजिक कार्य या व्यावसायिक कोर्सची प्रवेश क्षमता वाढवून द्यावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.

‘खूप विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विषयात नोकरीची संधी आहे. त्यामुळे विभागाच्या जागा वाढवाव्यात’, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष निशिकांत कांबळे, अजय घाते, भगवान पाटील, प्रसाद कुडकेकर, सचिन खंडारे, जयेश पठाडे, सतीश गायकवाड, प्रतीक गंगावणे, दिनेश भावले, आकाश निकाळजे, अमोल खरात आदींची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...