आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा प्रक्रिया प्रकल्प:पडेगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पातील धुरावर नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी वाढवली; सकाळपासूनच धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामाला गती दिली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावसिंगपुरा- पडेगाव रोडवरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात गेल्या महिनाभरापासून कचरा पेटवल्यामुळे निर्माण होत असलेल्या धुरामुळे रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. १ हजार लोकवस्ती असलेल्या या भागात धुराचे लोट थेट घरातील एसीतून बाहेर पडत असून अनेक जण आजारी पडत आहेत. यावर १४ मे रोजी ‘दिव्य मराठी’ने ग्लोरिया सिटीतील १ हजार लोकांच्या नाकातोंडात महानगरपालिकेमुळे धुराचे लोट या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यानंतर सकाळपासूनच धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामाला गती दिली.

भावसिंगपुऱ्याकडून पडेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर २०१२ मध्ये ग्लोरिया सिटी उभारण्यात आली. तब्बल १९२ फ्लॅट - रो-हाऊस असलेल्या या वसाहतीत ९०० ते १००० लोक वास्तव्यास आहेत. २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून या भागात कचऱ्या प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प वसाहतींपासून १२० मीटरवर आहे. गेल्या काही वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याला आग लागून धुराचे लोट घरांपर्यंत पोहोचत आहे. या समस्येवर दै. दिव्य मराठीने प्रकाश टाकला.

यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सकाळी १० वाजेपासून अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या हालचाली वाढल्या. तसेच धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या फेऱ्या होत आहेत. महानगरपालिकाचे टँकर आणि खासगी टँकरने धुरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापक अन्वर खान यांनी सांगितले की, धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणाची गती वाढवली आहे.

पाण्याचा मारा वाढवला आहे. ग्लोरिया सिटीचे रहिवासी गणेश बोदरे यांनी सांगितले की, कचरा डेपोला वारंवार आग लागून धुराचे लोट उठत आहे. मात्र सकाळपासून धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी गती वाढवली आहे. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले की, भावसिंगपुरा येथील आग मिथेन वायूमुळे लागत आहे. त्या ठिकाणी एक अग्निशमन दलाची गाडी लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...