आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचा बेमुदत बंद कायम ,लादलेले लॉकडाऊन तातडीने हाटवण्याची मागणी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाच्या विरोधात अजुनही सकारात्मक तोडगा निघु शकला नसुन शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी बीड शहरातील मोंढ्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील व्यापार बंद राहिले.

त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. लॉकडाऊनचा जाचक आदेश तातडीने रद्द करावा या मागणीवर जिल्ह्यातील व्यापारी संघटना कायम असल्याची माहिती बीड शहर बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी व बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी दिली आहे.

बीड शहरातील मोंढा भागात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी व्यापाऱ्यांची दुकाने बंद दिसुन आली. लॉकडाऊनच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवुन दिलेल्या ७ ते नऊ या वेळेत कोणीही दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे या बेमुदत बंदला व्यापाऱ्यांतुन वाढता पाठींबा मिळु लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातही अशीच परिस्थीती कायम होती. लॉकडाऊनमुळे मागील एक वर्षापासुन जिल्ह्यातील व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अनेक व्यापाऱ्यांचा दुकानाचा किराया आर्थिक अडचणीमुळे देता आलेला नाही. वीजेचे बील दहा महिन्यापासुन थकलेले असतांना दुसरीकडे महावितरणकडून व्यापाऱ्यांची वीज तोडली जात आहे. अशा अनेक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर लॉकडाऊन लादले गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर करत असतांना व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे दिसुन येत असुन लॉकडाऊनच्या आदेशात ठोक किराणा दुकानदारांसाठी सकाळी ७ ते ९ ही वेळ देण्यात आली असली तरी हे वेळ व्यापारी ग्राहकांसाठी सोयीची नाही.मोंढ्यात २५ टन सामानाचा ट्रक उतरवण्यासाठी किमात सहा तासाचा अवधी लागत असुन लॉकडाऊनच्या आदेशातील दोन तास कसे पुरनार हमालही माल उतरण्यासाठी कमी पडतात.त्याच बरोबर लॉकडाऊनमध्ये दुचाकी चारचाकी वाहनांना बंदी असले तर बीडच्या मोंढ्यात दहा किलो मिटरहुन दुकानदार कसा येऊ शकतो असा सवाल व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी व बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी,ग्राहक व सामान्य लोकांचे हीत लक्षात घेवुन लॉकडाऊन मागे घ्यावे अन्यथा व्यापारी महासंघाचा बेमुदत बंद येत्या ३० मार्च २०२१ पर्यंत कायम राहणार असल्याचेही सोहनी व पिंगळे यांनी म्हंटले आहे.

पहिल्याच दिवशी बेमुदत बंद यशस्वी

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाच्या विरोधात शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी बीड शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत लॉकडाऊनचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील सर्व दुकान व्यवसाय बंद ठेवले असुन जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कोट्यावधी रूपयांचा आर्थिक फटका सहन केला आहे. जो पर्यंत जिल्हाधिकारी लॉकडाऊन रद्दचा ठोस निर्णय घेत नाहीत व्यापाऱ्यांचा हा बेमुदत बंद कायम राहणार असुन लॉकडाऊनमध्ये ठरवुन दिलेल्या वेळेत व्यापारी दुकान घडणार नाहीत असे बीड शहर बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी व बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्यासह विनोद ललवाणी,मदन अग्रवाल,अनिल गुप्ता, मनमोहन कलंत्री,प्रमोद निनाळ ,दिपक कर्नावट, जवाहर कांकरीया ,सुरेंद्र रेसादनी, संजय साळुंके माजलगाव, प्रताप खरात, संजय बरगे गेवराई, विनायक मुळे, विजय अंडील वडवणी, सुलेख कलंत्री,विठठल मोरे तेलगाव, माऊली फड ,रिकबसेठ कांकरीया, नंदसेठ बियाणी,सुमीत लाहोटी परळी,ईश्वर लाेहिया, प्रदीप झरकर अंबाजोगाई ,महादेव सूर्यवंशी, अभिजीत वडगावकर, अशोक जाधव, गजानन गुंडेवार, सचिन डुबे, धारूर, अजीत कांकरीया, कलीमभाई पाटोदा, बबनराव ढाकणे,प्रकाश देसर्डा , शिरूर यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...