आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आक्षेप:अपक्ष उमेदवार संजय तायडे यांचा निवडणुक प्रक्रियेवर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभाग मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेवर अपक्ष उमेदवार संजय तायडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. मतदार केंद्रावर गेल्यानंतर बॅलेट पेपर देताना मतदारांची स्वाक्षरी घेण्यात येते. ज्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात येत होती, त्यावर बॅलेट पेपरवरील आकडा दर्शवण्यात आला होता. अशा प्रकारामुळे मतदाराची गोपनियता भंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आक्षेप नोंदवण्यासाठी गजानन मंदिर परिसरातील अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) येथील ९९ क्रमांकाच्या मतदान केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आक्षेप नोंदवत असताना तब्बल 20 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यांच्यामुळे येणाऱ्या मतदारांनाही थांबावे लागल्याचा आरोप इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला. मतदारांच्या रांगा केंद्राबाहेर लागल्या होत्या. आक्षेपावर अधिकाऱ्यांनी मत व्यक्त करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन आक्षेप नोंदवला. गोपनीयतेचा भंग करणारी ही प्रक्रिया असल्याने नव्याने निवडणुक घेण्याची मागणी तायडे यांनी केली. दरम्यान, मतदान प्रक्रिया थांबल्याचे कळताच राष्ट्रवादीचे राजेश पवार, प्रदीप विखे, भास्कर खेंडके, भाजपचे संजय केणेकर यांनी मतदान केंद्रात धाव घेतली. मतदान प्रक्रिया थांबवल्याने संजय तायडे यांच्यावर कारवाई तसेच मतदान करण्यास ३० मिनिटांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser