आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट:कोरोनाची लागण झालेल्या दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून स्वतंत्र सुविधा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोरोना रुग्ण असणाऱ्या दिव्यांगांना सुविधा नाहीत तसेच दिव्यांग रुग्ण आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे स्वत: डॉक्टरांनाच रुग्णाला उचलून न्यावे लागल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखील घेता आता औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा केल्या असून, दिव्यांग रुग्ण आढळून आल्यास रुग्णालयात पोहचवण्यासाठी स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि त्यांना उचलण्यासाठी एनजीओ, आरोग्य कर्मचाऱ्यांची सुविधा स्वतंत्रपणे केली आहे. अशी माहिती जि.प. आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी दिली.

जुलै महिन्यात बजाज नगर सिडको भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती. याच परिसरातील एका कुटुंबातील कंपनी कामगारास कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या घरातील सर्वांना कॉरंटाईन करत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णाच्या घरातील व्यक्तींनी सांगितले की, आमच्या घरात दिव्यांग १७ वर्षांचा मुलगा आहे. तो स्वत: स्वत:चे काहीच काम करु शकत नाही बोलू शकत नाही की, आपली वेदना देखील सांगू शकत नाही. इतरांवर अवलंबून आहे. आई-वडील रुग्णालयात असल्याने त्याची देखभाल कोण करणार. दुर्दैवाने त्या तरुणाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली होती. शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या दिव्यांग तरुणास रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्समध्ये ठेवण्याकरिता सहकार्य मागिले होते. परंतु त्या वेळी वाढलेली रुग्ण संख्या आणि परिस्थिती पाहता शेजारी-पाजारी कुणीही मदतीस आले नाही. त्यावेळी स्वत: डॉ. प्रशांत दाते आणि डॉ.संग्राम बामणे या आरोग्य अधिकाऱ्यांनी पीपीईट घालून त्या मुलास रुग्णवाहिकेत उचूलन ठेवले आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. हे वृत्त दिव्य मराठीने काळजी आणि निष्काळजीपणाचे उदाहरण देत प्रकाशित केले होते. याची दखल घेत आता दिव्यांग रुग्ण आढळून आल्यास त्यांची गैरसोय होवू नये. यासाठी काळजी घेत असून, व्हिलचेअर, स्ट्रेचर आणि एनजीओ, स्वयंसेवक यांची वेगळी सुविधा करण्यात आल्याचे डॉ.गंडाळ यांनी सांगितले.