आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भाष्य:भारतीय भांडवलशाही आता परिपक्व झाली आहे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा स्तंभ गौतम अदानी नव्हे तर भारतीय भांडवलशाहीबाबत आहे. हा भारतीय भांडवलशाहीसाठी सर्वात कठीण परीक्षेचा काळ आहे. ९० च्या दशकात, जेव्हा भारतीय बाजारांचा विस्तार होऊ लागला आणि त्यांचे आधुनिकीकरण झाले तेव्हा त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. या संकटांमध्ये हर्षद मेहता, केतन पारेख, फेअरग्रोथ आदींच्या रूपाने अनेक घोटाळ्यांचा समावेश आहे. प्रत्येकामुळे भारतीय बाजार आणि सर्वसामान्य भारतीयांमध्ये तयार होणारी नवीन इक्विटी संस्कृती बाधित होण्याची भीती निर्माण झाली. ही इक्विटी संस्कृती नव्या भांडवलशाहीसाठी खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक घोटाळ्याने संसदेला हादरा दिला, अनेक चांगल्या गुंतवणूकदारांना कंगाल केले आणि काही वाईट हेतू असणाऱ्यांना काही दिवसांसाठी का असेना जेलची हवा खावी लागली, मात्र ते घोटाळे आणि आज जे झाले त्यात पाच महत्त्वाचे फरक आहेत.

एक, त्यातील कोणतेही संकट मोठे झाले तेव्हा भारतीय बाजाराची अर्थव्यवस्था, ग्लोबल मार्केट आणि अर्थव्यवस्थेशी जुडली नव्हती. दोन, ते सर्व देशांतर्गत बाजारातील संकटे होती, त्यांच्या आर्थिक वा रेग्युलेटरी संस्थांच्या अंतर्गत हस्तक्षेपाने किंवा अर्थ मंत्रालयाने केलेल्या एक फोननेही फरक पडू शकत होता. आज संकट उभे ठाकले आहे, ते पूर्णपणे ग्लोबल बाजारांत आहे आणि आंतरराष्ट्रीय मीडियात पसरत आहे. तीन, बहुतांशी जुनी संकटं- उदाहरण म्हणजे केपी-७ (केपी म्हणजे केतन पारेख) त्या भारतीय कंपनींशी संबंधित होते, जे त्यांचा बहुतांश व्यवसाय भारतात चालवत हाेते. ताजे संकट भारताच्या सर्वात ग्लोबल कॉर्पोरेटशी संबंधित आहे. चार, जुनी संकट येथे निर्माण झाली आणि त्यांचा भंडाफोड भारताचेच रखवालदार (व्हिसलब्लोअर) वा शोध पत्रकारांनी केले होते. ताज्या संकटाचा खुलासा एका परदेशी आणि लहानशा वित्तीय संस्थेने केले आहे. आणि पाचवे, हा गोंधळ सुरू करणारे ते लोक आहेत ज्यांना निव्वळ नफा हवा आहे, जे शेअर्सची ‘शॉर्ट सेलिंग’ (शेअर्सचे मालक होण्याआधी विक्री) करून पैसे कमावू इच्छितात. त्यांचा स्वार्थ याच्यात आहे की ते ज्या कंपनीत ‘गुंतवणूक’ करत आहेत, तिचे अमेरिकेत विकले जाणारे बाँड्स आणि बिगर भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या ‘इन्स्ट्रुमेंट्स’ची ‘शॉर्ट सेलिंग’ करून त्याच्या शेअरची किंमत घसरवायची. कुणी सांगितले की, जेव्हा किंमत वाढेल तेव्हाच तुम्ही शेअर बाजारातून पैसे कमावू शकता? जेव्हा विदेशी लोक आपल्या कंपनीत गुंतवणूक करतात आणि आपल्या कंपन्यांना विदेशी शेअर बाजारात सूचिबद्ध केले जाते, जेव्हा जगात आपले कौतुक होते, जेव्हा एफडीआय आणि एफपीआयचे आकडे वर जातात, तेव्हा आपण आनंद व्यक्त करतो, मात्र जेव्हा घसरण होते, तेव्हा ती सहन करण्याची ताकद आपल्यात आहे? पहिली गोष्ट अशी की, आपल्यात किंवा आपल्या सरकारमध्ये वित्तीय संस्था वा रेग्युलेटर्समध्ये एवढी ताकद नाही की, ‘बाजार’ नावाच्या या शक्तिशाली गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकेल. दुसरीकडे, हे कबूल करावेच लागेल की नवे खेळाडूही बाजारात आपल्या सर्वात मोठ्या समूहाला मागे टाकून मोठा नफा कमावू शकतात. चांगल्या भांडवलशाही व्यवस्थेत बाजारांवर कोणताही राष्ट्रवादी चष्मा नसतो. जर पैशाला कोणताच रंग नसतो, तर तो पासपोर्टही ठेवत नाही आणि जे बाजारात पैशांतून खेळतात, त्यांच्यासाठी पैशांवरील त्यांचे प्रेम सर्वोच्च असते. सर्व राष्ट्रीय, राजकीय वा सैद्धांतिक निष्ठा त्यानंतर असतात. यामुळेच या ताज्या संकटाला भारतीय भांडवलशाहीसाठी आतापर्यंतची सर्वात कठीण परीक्षा समजत आहोत आणि या संकटाने बाजारात पूर्ण एक आठवडा घालवला आहे, तर आमचा निष्कर्ष आहे की, भारतीय भांडवलशाहीने ही परीक्षा उत्तीर्ण करून घेतली.

कारण, दोन आठवडे होत आहेत आणि सरकारने याबाबत एक शब्दही सांगितले नाही, कोणत्याही रेग्युलेटरी संस्थेने कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप केला नाही, अदानी ग्रुपने या धक्क्याचा सामना चांगल्या पद्धतीने करावा म्हणून त्याची मदतही करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त जास्तीत जास्त एवढेच केले की नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) शहाणपणाचे पाऊल टाकत अधिक अटकळ रोखण्यासाठी मार्जिन पेमेंट वाढवले आहे. शेअर बाजारात अशी उलथापालथ होत असेल तेव्हा असे करणे एनएसईचा हक्क आहे. अदानी ग्रुपने याला भारत व त्याच्या संस्थांचे नुकसान करण्याची विदेशी कट म्हटले, मात्र सरकार, अर्थ मंत्रालय, रेग्युलेटरर्स व सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व गप्प आहे. पाच दशकांत भारताची सर्वात शक्तिशाली राजकीय सत्ता जर अशा स्थितीत असे संकेत देते की या प्रकरणाला कंपनी व बाजाराने आपसातच मिटवावे, तर असेच म्हटले जाईल की भारतीय भांडवलशाही आपल्या पायावर उभी राहत आहे. हे असेच समजा की ‘कायद्याला आपले काम करू द्या’ ऐवजी ‘बाजाराला आपले काम करू द्या’ नवा मंत्र झाला आहे.

याउलट, असा विचार करा की जेव्हा आपली राजकीय अर्थव्यवस्था एवढी मजबूत झाली नव्हती तेव्हा शक्तिशाली भारतीय सत्ता यंत्रणा या स्थितीत जे करते, तेच जर त्यांनी आज केले असते तर काय झाले असते? तेव्हा ट्रेडिंग स्थगित करणे आणि चौकशी करणे सुरू करण्यासारखे विचार वरचढ ठरले असते. अशा पावलांचे संकेतही आपल्या उदयोन्मुख भांडवलशाहीचे मोठे नुकसान करू शकले असते. ही बकवास आहे, कधी असे काही होईल, असे म्हणू नका. व्होडाफोन प्रकरणात मागील तारखेच्या केलेल्या दुरुस्तीमुळे भारतावरील जगाच्या विश्वासाला जो धक्का बसला तो अद्यापही परतला नाही. असे विचार आज येत नाहीत ही चांगली गोष्ट आहे.(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

शेखर गुप्ता एडिटर-इन-चीफ, ‘द प्रिंट’ Twitter@ShekharGupta

बातम्या आणखी आहेत...