आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने २१ ते २६ एप्रिल दरम्यान सहाव्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन श्री शिवछत्रपती स्टेडियम म्हाळुंगे बालेवाडी येथे करण्यात आले आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या ३० सदस्यीय महिला व पुरुष संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली.
भारतीय संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १४ ते २० एप्रिलदरम्यान जिल्हा रोलबॉल संघटनेच्या बाणेर येथील मैदानावर घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते.
भारतीय संघ पुढील प्रमाणे
मुले : आकाश गणेशवाडे, हर्षल घुगे, आदित्य सुतार, अजिंक्य केरकेरी, मिहिर साने (महाराष्ट्र), सचिन सैनी (उत्तर प्रदेश), विकी सैनी (राजस्थान), निखिल चिंडक (कर्नाटक), गुरुवचन सिंग (मध्य प्रदेश), करन सिंघानिया (दिल्ली), प्रदीप टी. (केरळ), श्रीकांत साहू (झारखंड). अतिरिक्त खेळाडू : सुहास डोफे (महाराष्ट्र), अनुराग बसफोर (आसाम) व अभिमन्यू (केरळ).
मुली : सुहानी सिंग, श्रुती भगत (महाराष्ट्र), इशिका शर्मा (उत्तर प्रदेश), अश्विनी बिलोनिया, जिया जोशी (मध्य प्रदेश), देवांशी पटेल (गुजरात), खुशी गुप्ता, रुही राजपूत (जम्मू काश्मीर), अलीशा फरहीन (आसाम), तन्वी भटनागर, पूजा चौधरी (राजस्थान), सुस्मिथा एस एस (तामिळनाडू). अतिरिक्त खेळाडू : अंजली कपूर (महाराष्ट्र), खुशी वानखेडे (मध्य प्रदेश) व ईशा सोनकर (झारखंड).
फिटनेस प्रशिक्षकांचीही नियुक्ती
भारतीय संघासाठी यंदा फिटनेस प्रशिक्षक तेजस्विनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून मधू शर्मा व अमित पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यांना विक्रम राठोड व अपर्णा महाडिक सहाय्यक प्रशिक्षक म्हणून साथ देतील. संघ व्यवस्थापक म्हणून मोहिनी यादव या काम पाहतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.