आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

व्होकल फॉर लोकल:रक्षाबंधनासाठी बनल्या आहेत स्वदेशी 'प्लॅन्टेबल सीड' राख्या, आनंदी इम्पॉवर फाऊंडेशनच्या पुढाकारातून मिळाले महिलांना काम

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आनंदी इम्पॉवर फाऊंडेशनच्या पुढाकारातून मिळाले महिलांना काम अन् ‘व्होकल फॉर लोकल’चाही गजर

यंदाच्या रक्षाबंधनाचे वैशिष्ठ्य ठरू शकेल, अशा ‘प्लॅन्टेबल सीड’ राख्या ‘आनंदी इम्पाॅवर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने निर्माण केल्या आहेत. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने भाऊ-बहिणींचे नाते या बियांच्या राखीच्या माध्यमांतून किचन गार्डनमध्ये रूजावे, उमलावे आणि फुलत रहावे, अशी भावना या राख्यांच्या निर्मितीमागे आहे... आणि हो, राख्यांच्या उत्पादनांमधील चिनी मक्तेदारीला रोखण्याचा छोटा स्थानिक स्वदेशी हेतूदेखील या प्रयत्नांमागे आहे!

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांच्या संकल्पनेतून या ‘प्लॅन्टेबल सीड’ राख्या तयार झाल्या आहेत. रहाटकर म्हणाल्या, “या सीड राख्यांच्या निर्मितीमागे तीन हेतू आहेत. एक लाॅकडाऊनमुळे हताश, निराश झालेल्या महिलांच्या हाताला काम देणे, दुसरे, नात्याला निसर्गपूरक बनविणे आणि तिसरे म्हणजे, राख्यांमधील चीनी कंपन्यांच्या सुळसुळाटाला रोखण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्होकल फाॅर लोकल’ अशी जी घोषणा दिली आहे, त्याचा हा स्थानिक आविष्कार आहे.” देशभरात महिला मोर्च्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा स्वदेशी राख्या बनविल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अतिशय सुबक अशा पॅकिंगमध्ये सुरेख राखी हॅम्पर महिलांनी बनविले आहे. त्यामध्ये तीन प्लॅन्टेबल सीड राख्या, मधुबनी पेंटिग्जवर रेखाटलेली तीन ग्रीटिंग्ज कार्ड्स, रोली चावल (हळद व कुंकु), सुशोभित सुपारी आणि अठरा प्रकारच्या बियांच्या पॅकेटचा समावेश आहे. भेंडी, काकडी, मुळा, टोमॅटो, मेथी, पालक, चुका, वांगे, कांदा, हिरवी मिरची, हिरवे धने, कारले, बीट रूट्स, फ्रेंच बिन्स, गवार यासारख्या किचन गार्डन्समध्ये रूजू शकतील, अशा भाज्यांच्या बिया त्यात आहेत.

‘आनंदी इम्पाॅवर फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था आहे. शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील, दिव्यांग, निराधार आणि भटक्या जमातीमधील मुलींसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, गरजू महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे या हेतूने 'आनंदी'ची स्थापना झाल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. राख्यांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.