आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविडमध्ये तीन वर्षांपूर्वी बंद झालेली छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता येत्या २८ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा असेल. अहमदाबाद, उदयपूर आणि मुंबईसाठी सायंकाळचे विमान सुरू करण्यासाठी विचार केला जात असल्याचे इंडिगोच्या नागरी उड्डयन विभागाचे चेअरमन तथा जनसंपर्क अधिकारी सुनीत कोठारी यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (३ मार्च) नवी दिल्ली येथे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत यांच्यासमवेत कोठारी यांनी विविध विमान कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि नागरी उड्डयन विभागाशी चर्चा केली.कोविडनंतर बंद झालेली विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा २०२० मध्ये कोविडच्या प्रादुर्भावानंतर बंद करण्यात आली होती.
अहमदाबाद, उदयपूरसाठी आग्रह : अहमदाबाद आणि उदयपूरची घोषणा लवकर केल्यास विदेशी पर्यटक अथवा प्रवाशांना आरक्षणासाठी फायदा हाेईल. अहमदाबादला छत्रपती संभाजीनगरहून आठवड्यातून चार दिवस विमानसेवा होती. ती पूर्ववत करण्याची घोषणा केल्यास पर्यटकांना आगाऊ आरक्षण करता येते. विविध योजनांमध्ये राज्य शासनासोबत करार केल्यास विमानसेवेला त्याचा फायदा होईल. काही योजनेत निश्चित केलेली प्रवासी क्षमता न मिळाल्यास शिल्लक जागेचे पैसे राज्य शासन देते आणि निर्धारित प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आले तर वरची रक्कम विमान कंपनी शासनाला परत करते.
दिल्लीत अधिकाऱ्यांच्या भेटी इंडिगोचे ग्लोबस सेल्स हेड विनय मल्होत्रा, एअर इंडियाचे सेल्स हेड मनीष पुरी, अलायन्स एअरचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी अमरेश चौधरी आदींची भेट घेतल्याचे कोठारी यांनी सांगितले. उडान १ अथवा ५ मध्ये विमानसेवेचा समावेश करावा अशी विनंती अलायन्स एअरला करण्यात आली आहे. उदयपूर-औरंगाबाद सेवा सुरू करणे शक्य असल्याचे त्यांना पटवून दिले.
मंगळवार, गुरुवारचे वेळापत्रक २८ मार्चपासून वेळापत्रकात बदल राहील. दोन दिवस बंगळुरू येथून इंडिगोचे विमान दुपारी ४ वाजता निघून सायंकाळी ५.३५ वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. परतीसाठी सायंकाळी ६.०५ वाजता निघून बंगळुरूला रात्री ७.४० वाजता पोहोचेल.
शनिवारी वेळेत बदल शनिवारी बंगळुरू येथून दुपारी ३ वाजता निघालेले इंडिगोचे विमान दुपारी ३.३५ वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचेल. परतीसाठी दुपारी ४.०५ वाजता निघून बंगळुरू येथे सायंकाळी ५.४५ वाजता पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.