आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादकरांसाठी एक आनंदवार्ता. येत्या दोन जुलैपासून दिल्ली - औरंगाबाद असे सकाळच्या सत्रातील उड्डाण सुरू करणार असल्याची घोषणा इंडियोगोची कंपनीतर्फे करण्यात आली आहे. शिवाय हिवाळी सत्रापूर्वी औरंगाबादहून बंगळुरूसाठीही फेऱ्या सुरू करणार असल्याचे संकेत कंपनीच्या उपाध्यक्षांनी दिले आहेत, अशी माहिती औरंगाबाद डेव्हलपमेंट टुरिझम फाऊंडेशनच्या सिव्हील कमिटीचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी दिली.
पूर्ण क्षमतेने सेवा
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 27 मार्च पासून विमानसेवा पूर्ण क्षमतेने खुल्या केल्या आहेत. यानंतर सर्वच विमान कंपन्या आपल्या सेवा कार्यान्वित करण्यासाठी वेगाने हालचाली करत आहे. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या पुढाकाराने तसेच व्यापारी उद्योजक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्या रेट्यामुळे औरंगाबादेतून विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
तीन कंपन्यांची उड्डाणे
एअर इंडिया इंडिगो आणि आता फ्लाय बिग अशा तीन कंपन्यांचे विमान औरंगाबादेतून उड्डाण करत आहेत. दिल्ली, मुंबई, हैदराबाद शहर प्रामुख्याने जोडली गेली आहेत. औरंगाबादेतून परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय पर्यटनानिमित्त औरंगाबादेत येणाऱ्यांचे प्रमाणही वर्षाकाठी चार ते साडेचार लाखांच्या घरात आहे. या क्षमतेचा फायदा घेत विमानसेवा सुरू केल्यास कंपन्यांना फायदा होणार आहे. तसेच औरंगाबाद येथील पर्यटन उद्योगाला ही नवे पंख मिळणार आहेत.
1 जून रोजी फ्लाय बिग्ने औरंगाबाद हैदराबाद ही विमानसेवा सुरू केली. याच वेळी विमानतळ प्राधिकरण आणि औरंगाबाद डेव्हलपमेंट टुरिझम फाउंडेशन यांनी टूर ऑपरेटरच्या घेतलेल्या बैठकीत उमरा निमित्त औरंगाबादेतून आखाती देशात जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे समोर आले.
औरंगाबाद-दिल्ली सेवा सुरू
आखाती देशांत साठी विमानसेवा सुरू झाल्यास औरंगाबादेतून उत्तम व्यवसाय शक्य असल्याचे त्यांनी विमान कंपन्यांत पुढे माहितीच्या आधारे पटवून दिले. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादेतून अनेक शहरांच्या संधी खुल्या होणार आहेत. कोरोनापूर्वी सुरू असलेली इंडिगोची औरंगाबाद बंगळुरू विमानसेवा हिवाळ्यापूर्वी सुरू करण्याचे प्रयत्न करत असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.