आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरासाठी भांडणारे कुणी नसल्याची प्रतिक्रिया:‘इंडिगो’चे सायंकाळचे बंद विमान चेन्नई-सिंगापूरसाठी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा विमानतळावरून मुंबईला जाणारे सायंकाळचे विमान बंद केल्यामुळे नागरिकांना एका दिवसात मुंबईला जाऊन परत येणे अशक्य झाले आहे. इंडिगोचे मुंबईसाठीचे सायंकाळचे विमान चेन्नई ते सिंगापूरसाठी वापरले जात आहे. शहरासाठी भांडणारे कुणी नसल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. एअर इंडियाकडे विमाने उपलब्ध नसल्यामुळे अतिरिक्त विमान सुरू करण्यास अडचणी आहेत. इंडिगोने छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी सायंकाळचे विमान सुरू केले होते. यामुळे १८६ प्रवाशांची सोय झाली होती. मात्र, इंडिगोने हे विमान चेन्नई-सिंगापूरसाठी वापरले. छत्रपती संभाजीनगर-मुंबई फेरीपेक्षा जास्त महसूल त्याला मिळत आहे. इंडिगोची ६ विमाने नवी दिल्ली विमानतळावर तर ३ विमाने मुंबईत मेंटेनन्ससाठी उभी आहेत.