आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रगती महिला मंडळाच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात आयोजित पहेनावा फॅशन शोला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराती, बिहारी अशा ४० प्रकारच्या साड्या ८० महिलांनी परिधान करत रॅम्पवॉक केला. विशेष म्हणजे लावणी, गरबा, राजस्थानी घुमर असे विविध नृत्यप्रकार तर दाद मिळवणारे ठरले.
विशेष अतिथी म्हणून महिला संघटनच्या अध्यक्ष अनुसूया मालू, तर औरंगाबाद माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष संतोष लड्डा, राखी लड्डा, कल्पना काळे, रुपाली मणियार उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना प्रमिला चांडक यांची होती. प्रकल्प प्रमुख म्हणून पुष्पा बाहेती, तारा सोनी, प्रमिला काबरा यांनी काम पाहिले. गायत्री रांदड, पूजा करवा यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी उषा धूत, पुष्पा लड्डा, सदस्यांनी सहकार्य केले. स्वाती खटोड यांनी आभार मानले.
वीरांगनांची वेशभूषा : रणांगणांवर शमशेर चालवणारी झाशीची राणी, शिवबाला घडवणारी माँ जिजाऊ, मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वेशभूषांतील सादरीकरणाने सुरुवात झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.