आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (डब्ल्यूआयसीएफ) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे (आयआयएसएफ) बंगळुरूमधील कोठनूर येथे न्यूझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरूवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात इंडिया डेव्हलपमेंट संघाने सिंगापूरवर १४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात इंडिया डेव्हलपमेंट संघाने निर्धारित १६ षटकांत ६४ धावा उभारल्या, प्रत्युत्तरात सिंगापूरचा डाव 16 ओव्हरमध्ये ५० धावांवर रोखत इंडिया डेव्हलपमेंटने विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत यजमानं भारतासह, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई व सिंगापूर हे देश सहभागी झाले. या स्पर्धेत खुला गट व मास्टर्स (४०+) गटाचे संघ सहभागी झाले आहेत. इंडिया डेव्हलपमेंट संघाच्या दर्शन (२१ धावा ३ बळी), शुभम (१३ धावा व दोन बळी) व चेतन शहाने १२ धावा करत चमकदार कामगिरी केली. सिंगापूरच्या तमिम व विपुल यांनी (प्रत्येकी १५ धावा व २ बळी) जोरदार लढत दिली होता, मात्र इंडिया डेव्हलपमेंट संघाने विजयश्री खेचून आणली.
श्रीलंकेकडून भारत पराभूत
दुसऱ्या एका सामन्यात श्रीलंकेने भारतावर दोन धावांनी निसटता विजय मिळवला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने ६९ धावा उभारल्या. तत्पूर्वी, भारतीय संघाने सिंगापूरचा 80 धावांनी पराभव केला. प्रत्युत्तरात भारतीय संघ ६७ धावा करु शकला. इतर एका सामन्यात न्यूझीलंडने युएईवर ४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जागतीक संघटनेचे अध्यक्ष टोनी वॅटिकन, भारताचे अध्यक्ष अजय नाईक, महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन बाळ तोरसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.