आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिके पटकावली:इंद्रधनुष्य ;विद्यापीठाच्या संघाला चार पारितोषिके

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने इंद्रधनुष्य या राज्यस्तरीय युवक महोत्सवात चार पारितोषिके पटकावली. शॉर्टफिल्म आणि इन्स्टॉलेशनमध्ये प्रथम, मृदमूर्ती कलेत दुसरे तर एकांकिकेत तृतीय बक्षीस मिळाले, तर मुंबई विद्यापीठाच्या संघाने १४ बक्षिसे मिळवत सर्वोत्कृष्ट संघाचे पारितोषिकावर नाव कोरले.राहुरी येथील कृषी विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या महोत्सवात ऋषिकेश भुतेकरने ‘इन्स्टॉलेशन’ व शॉर्टफिल्ममध्ये प्रथम पारितोषिक मिळवले.

त्यात दुर्गेश्वरी अंभोरे, समीर विरुटकर, वैष्णवी दांडगे, प्रतीक्षा कुरडले, प्रिया सोनुने, मृणाल देशपांडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विशाल रणदिवे, अक्षता किरकसे, सतीश धोत्रे, गणेश रोडगे, सोमनाथ भंडारे, ओंकार वट्टे यांनी भूमिका केलेल्या ‘कस्टमर केअर’ एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. मृदमूर्तिकला या प्रकारात ऋषिकेश मुऱ्हेकरने दुसरा क्रमांक पटकावला.

इन्स्टालेशनमध्ये विशाल घुगे, विशाल धुमाळ, वेदांत वनशिंगे, सौरभ श्रीभाते यांच्या संघाने प्रथम पारितोषिक मिळवले. दरम्यान, संघप्रमुख डॉ. गणेश शिंदे म्हणाले, इंद्रधनुष्यमध्ये २८ पैकी २६ कलाप्रकारात आम्ही भाग घेतला होता. त्यात ४ बक्षिसे मिळवली. आता जानेवारीत पुण्यात पश्चिम विभागीय युवा महोत्सव होणार आहे. त्यातही विद्यापीठाचा संघ पूर्ण तयारीने उतरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...