आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा:औद्योगिक व शालेय स्पर्धा 11 नोव्हेंबरपासून रंगाणार; रॉकचे उपाध्यक्ष सतीश मांडेंनी दिली माहिती

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेरॉक समूहातर्फे कोरोनानंतर 3 वर्षांनी 16 व्या औद्योगिक चषक आणि 14 व्या आंतरशालेय व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा 11 नोव्हेंबरपासून जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर या स्पर्धा रंगणार आहे.

पत्रकार परिषदेत दिली माहिती

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. विजेत्यांना रोख बक्षीस व पारितोषिक आणि चषक देण्यात येणार असल्याची माहिती व्हेरॉकचे उपाध्यक्ष सतीश मांडे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी (23 सप्टेंबर ) दुपारी दिली. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सदस्य प्रमोद माने उपस्थित होते.

काय म्हणाले मांडे ?

मांडे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रचंड उत्सुकता असलेल्या औद्योगिक व आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. खेळाडू व संघ सतत या स्पर्धेच्या आयोजनाची मागणी करत होते. औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एकूण 20 संघस सहभाग होतील. यात 10 औद्योगिक व 10 इतर संस्थांचे संघ असतील. ही स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जाईल. दुसरीकडे, आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या 40 शाळेच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. ही स्पर्धा 15 षटकांची असेल. एका दिवसांत 3 सामने खेळवले जातील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. अंतिम सामन्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

लाखो रुपयांची बक्षीसे, दुचाकी भेट

औद्योगिक स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख 20 हजार व चषक, उपविजेत्यास 85 हजार रुपये रोख व चषक देण्यात येईल. तसेच शालेय स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख व चषक तर उपविजेत्या संघास 70 हजार रुपयांचे पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. दोन्ही गटातील मालिकावीरला दुचाकी भेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला प्रत्येकी 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवले आहे.

19 वर्ष, बाहेरच्या खेळाडूंना संधी

यंदापासून औद्योगिकच्या प्रत्येकी संघात 19 वर्षाखालील 2 खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. एक खेळाडू अंतिम 11 मध्ये खेळेल. त्याचबरोबर, प्रत्येक संघात जिल्ह्याबाहेरी कुठल्याही 4 खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेतील चुरस आणखी वाढणार असल्याचे मांडे यांनी सांगितले.

स्पर्धा प्रमुखपदी राहुल टेकाळे

या स्पर्धेसाठी आयोजन समितीचीही स्थापना करण्यात आली. स्पर्धा प्रमुख म्हणून राहुल टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीमध्ये अजय देशपांडे, हेमंत मिरखीलकर, सय्यद जमशीद, सुशील देव, मच्छिंद्र जाधव, अँथनी निकोलस यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...