आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक टी-20 चषक क्रिकेट स्पर्धा:जाॅन्सन संघाने हायकोर्ट वकील संघाला हरवले, अमर यादव सामनावीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या एएससीएए औद्योगिक टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत जाॅन्सन संघाने विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात जाॅन्सनने हायकोर्ट वकिल संघावर ७ गड्यांनी मात केली. लढतीत अमर यादव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अजय शितोळेने अर्धशतक व्यर्थ ठरले.

वकिल संघाच्या 158 धावा

नाणेफेक जिंकून जॉन्सनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हायकोर्ट वकिल संघाने २० षटकांत ७ बाद १५८ धावा उभारल्या. यात यष्टिरक्षक सलामीवीर फलंदाज अजय शितोळेने अर्धशतक झळकावले. त्याने ४२ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५६ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर कुणाल काळेने २८ चेंडूंत ४ चौकारांसह २९ धावा जोडल्या. ज्ञानेश्वर पाटीलने २१ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचत ३० धावा जोडल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साईसागर अंबिलवादे (१), दर्शन देशमुख (९), पवन इप्पर (१), सय्यद दयाल (९*), परिक्षित मुत्रक (६) हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. जॉन्सनकडून पांडूरंग रोडगेने ४ षटकांत २८ धावा देत ३ फलंदाज तंबूत पाठवले. एकनाथ बांगरने ३२ धावा देत २ बळी घेतले. अनिश पुजारीने एकाला टिपले.

राघव, अमरची अर्धशतकी भागीदारी

प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघाने १७.४ षटकांत ३ गडी गमावत १५९ धावा करत विजय साकारला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रविण क्षीरसागर अवघ्या ४ धावांवर परतला. दुसरा सलामीवीर राघव नाईकने संयम दाखवला. त्याने ३९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४२ धावा काढल्या. अनिश पुजारीने २२ चेंडूंत १ चौकार व १ षटकार लगावत १८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या अमर यादवने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ६ सणसणीत चौकार व ३ षटकार खेचत नाबाद ६२ धावांची विजयी खेळी केली. राघव व अमरने तिसऱ्या गड्यासाठी ७७ धावांची भागीदारी रचली. दिपक ११ धावांवर नाबाद राहिला. वकिलांकडून विजय देशमुख, अमित वायकोस, अजय शितोळे यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...